Home नाशिक श्रीक्षेत्र साळसाणे येथे शिव गोरक्षनाथ प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त—

श्रीक्षेत्र साळसाणे येथे शिव गोरक्षनाथ प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त—

181

आशाताई बच्छाव

IMG-20230509-WA0024.jpg

श्रीक्षेत्र साळसाणे येथे शिव गोरक्षनाथ प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त—

१० मे पासून त्रिदिवशीय नवनाथ भक्तिसार संगीतमय कथा व कीर्तन महोत्सव–

हभप ज्ञानेशजी महाराज जोगी (शिवनीकर) यांच्या मुखाविंदातून संगीतमय कथेचे निरूपण होणार–

दैनिक युवा मराठा
निफाड प्रतिनिधी–रामभाऊ आवारे

श्रीक्षेत्र साळसाणे तालुका चांदवड येथे शिव गोरक्षनाथ प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन निमित्ताने नाथभक्त उमेश (आप्पा) महाराज चव्हाण ॐ चैतन्य कानिफनाथ मंदिर (हिरापुर) दरसवाडी मठाधिपती यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार 10 मे 2023 ते शनिवार 13 मे 2023 या कालावधीत त्रिदिवशीय नवनाथ भक्तीसार संगीतमय कथा व किर्तन महोत्सव शिव गोरक्षनाथ मंदिर येथे अखिल कोट ब्रम्हांडनायक श्री गुरुदेव दत्त व नवनाथ महाराज कृपेने समस्त ग्रामस्थ साळसाणे व ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित केली आहे तरी या सुवर्णमय संधीचा भाविक भक्त व पंचक्रोशीतील समस्त जनतेने अवश्य लाभ घ्यावा अशी माहिती समस्त ग्रामस्थ व शिव गोरक्षनाथ मंदिर आयोजक समितीने दिली आहे.
नवनाथ भक्तिसार संगीतमय कथा प्रवक्ते म्हणून ह भ प ज्ञानेश्वर महाराज जोगी शिवनीकर (हिंगोली) यांच्या मुखारविंदातुन दररोज रात्री ८ ते ११ या नियोजित वेळेत होणार असून शनिवार दि.१३/५/२०२३ रोजी सकाळी ८ वा. ग्रंथ व पादुका मिरवणुक व सकाळी ९ वा . ह.भ.प.श्री.ज्ञानेशजी महाराज जोगी, शिवनीकर (हिंगोली) यांचे काल्याचे किर्तन होईल व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी साळसाणे सह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या ज्ञानामृताचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असेही आयोजक समितीच्या व ग्रामस्थांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी जय बाबाजी भक्त परिवार, नवनाथ भक्त मंडळ, शिव गोरक्षनाथ ग्रुप, भारतीय सैनिक दल ग्रुप, साळसाणे, शिवगर्जना ग्रुप, वारकरी संप्रदाय भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ साळसाणे, चैतन्य कानिफनाथ मंदिर, चव्हाण वस्ती हिरापुर (दरसवाडी) सर्व नाथ भक्त मंडळ मंडप साऊंड सिस्टीम ठाकरे मंडप अॅण्ड साऊंड सिस्टीम, साळसाणे आदींचे सहकार्य लाभणार आहे.

Previous articleमहिला पोलिसांचा असाही प्रामाणिकपणा–
Next articleहैदराबाद मुक्तीसंग्रामावर आधारीत सात प्रस्ताव धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना सादर  
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.