Home नाशिक मेशीत जेनेरिकाँर्ट सेवा मेडिकलचे गणेशानंदपुरीजी महाराजांच्या हस्ते उदघाटन

मेशीत जेनेरिकाँर्ट सेवा मेडिकलचे गणेशानंदपुरीजी महाराजांच्या हस्ते उदघाटन

210

आशाताई बच्छाव

IMG-20230425-WA0024.jpg

(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा:- मेशी ता. देवळा येथे जेनेरिकार्ट स्वस्त औषधी सेवा मेडिकलचे देवदारेश्वर पिंपळगाव (वा.) येथील गणेशानंदपुरीजी महाराज यांच्या हस्ते नुकतेच उदघाटन झाले. मेशी हे सात हजार लोकवस्तीचे मोठे गाव असून निंबोळा, महालपाटने, वासोळ,डोंगरगाव, देवपूरपाडे,,खालप ,दहिवड या गावांच्या जवळ असून ह्या गावांचा मेशी गावाशी नेहमीच संपर्क येत असल्याने परिसरात जेनेरिकार्ट स्वस्त औषधी सेवा नसल्याने ही बाब ओळखून येथील डॉ. किशोर भामरे व ऋषिकेश मेडिकलचे संचालक कृष्णा माने यांनी परिसरातील रुग्णांना स्वस्त औषधी सेवा उपलब्ध करून दिल्याने रुग्णांची चांगली सोय झाली आहे. त्यामुळे परिसरातील जनते कडून त्यांचे आभार मानले जात आहेत.
उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेनेरिकार्टचे झोनल हेड कैवल्य रिसबुड,नाशिक हेड भूषण शिंदे उपस्थित होते.

Previous articleव-हाणे प्रकरणात अखेर चौकशी समिती स्थापन…न्यायासाठीचा लढा अखेरपर्यत सुरुच राहणार!               
Next articleधांद्री वि का सहकारी सोसायटी च्या सभापती पदी श्री बाळासाहेब चव्हाण यांची बिनविरोध निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.