Home नाशिक सांगवी फाटयाजवळ एसटी बसला अपघात २७ प्रवासी जखमी

सांगवी फाटयाजवळ एसटी बसला अपघात २७ प्रवासी जखमी

124

आशाताई बच्छाव

Screenshot_20230207-175719_WhatsApp.jpg

भिला आहेर युवा मराठा न्युज नेटवर्क
देवळा प्रतिनिधी:- मुंबई आग्रा महामार्गावरील उमराणे जवळील सांगवी फाटा येथे सकाळी 9 वाजेच्या दरम्यान नाशिक वरून चाळीसगावकडे जाणारी बस गतिरोधकाजवळ कंटेनरला पाठीमागून धडकली, या अपघातावेळी अपघातग्रस्त बसमधून प्रवास करणारे उमराणे येथील मालेगाव शेतकी संघाचे माजी चेअरमन रत्नाकर शिवाजी देवरे यांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ जाणता राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांना मोबाईल वरून अपघाताची माहिती दिली.देवरे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह अपघात स्थळी मदतीसाठी धाव घेतली. तसेच उमराणे बाजार समिती, सौंदाने ,उमराणे व सोमा कंपनीच्या रुग्णवाहिकांना घटनास्थळी बोलावून 27 जखमी प्रवाशांना तात्काळ उमराणे ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. यावेळी जाणता राजा मित्रमंडळाचे कार्यकर्ते,बाजार समितीचे रुग्णवाहिका सेवक व कर्मचारी, तसेच उमराणे,सांगवी, चिंचवे येथील नागरिक व सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त प्रवाशांना मोलाची मदत केली.

Previous articleअखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ अप्पासाहेब पवार कालवश.
Next articleश्री.रोकडेश्वर यात्रा महोत्सवानिमित्त रातोळी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन …
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.