Home नाशिक अजमीर सौंदाणे सरपंच अपात्रतेच्या निर्णयाला ग्रामविकास मंत्र्यांची स्थगिती

अजमीर सौंदाणे सरपंच अपात्रतेच्या निर्णयाला ग्रामविकास मंत्र्यांची स्थगिती

110

आशाताई बच्छाव

IMG-20230124-WA0047.jpg

अजमीर सौंदाणे सरपंच अपात्रतेच्या निर्णयाला ग्रामविकास मंत्र्यांची स्थगिती
मनोहर देवरे (प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क)

अजमीर सौंदाणे येथील लोकनियुक्त सरपंच धनंजय पवार यांच्यावर नुकताच कर्तव्यात् कसूर केल्याचा ठेवून विभागीय आयुक्त नाशिक यांनी अपात्र घोषित केले होते. या अन्यायकारक निकालच्या विरोधात सरपंच धनंजय पवार यांनी ग्रामविकास मंत्री यांचेकडे अपील दाखल केला होता. यावर आज सुनावणी होऊन आयुक्तांच्या निर्णयाला ग्रामाविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्थगिती दिली आहे.
स्थगिती च्या निर्णयाचे संपूर्ण अजमीर सौंदाणे गावाने स्वागत केले असून समाधान व्यक्त केले आहे. अजमीर सौंदाणे गावातील नागरिकांनी आयुक्तांच्या निर्णयाविरोधात तहसील कार्यालय बागलाण येथे शेकडो नागरिकांनी जमून निवेदन दिले होते व उपोषणाचा इशाराही दिला होता. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नसतांनाही फक्त राजकीय विरोधामुळे सरपंचांवर अपात्रतेचा अन्यायकारक निर्णय झाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते, स्थगितीचा निर्णय समजताच गावातील तरुणांनी फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला आहे व सरपंचांची राजकीय लोकप्रियता व प्रगती थांबवण्यासाठीच अपात्रतेचा प्रकार घडला असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
मी केलेली कामे ही गावाच्या हिताचीच असून त्यात कुठेही माझा वैयक्तिक स्वार्थ नव्हता, किंवा कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नव्हता. परंतु प्रशासकीय चुकीचे खापर माझ्यावर फोडून नियोजनबद्ध पणे माझी राजकीय तसेच समाजिक प्रतिमा मालिन करण्यासाठी ही सर्व कार्यवाही झाली. परंतु सर्व गाव माझ्या पाठीमागे असल्याने माझा सत्याचा लढा मी यापुढेही सुरूच ठेवणार आहे. आयुक्तांच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्याने संपूर्ण गावाने आनंदोत्सव साजरा केला आहे.(सरपंच धनंजय पवार)

Previous articleनाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीत सुरेश भीमराव पवार यांना विजयी करा
Next articleदेवळा – सटाणा महामार्गावर कांदा चाळ तोडुन कंटेनेर थेट शेतात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.