Home गडचिरोली भेंडाळा गावातील भूषण नंदगीरवार याची अखिल भारतीय योग स्पर्धेसाठी निवड .

भेंडाळा गावातील भूषण नंदगीरवार याची अखिल भारतीय योग स्पर्धेसाठी निवड .

134

आशाताई बच्छाव

IMG-20221225-WA0050.jpg

भेंडाळा गावातील भूषण नंदगीरवार याची अखिल भारतीय योग स्पर्धेसाठी निवड .

चामोर्शी,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : स्थानिक केवळरामजी हरडे वाणिज्य महाविद्यालयात बीकॉम प्रथम वर्षात शिकत असलेला भूषण नंदगीरवार याची भुवनेश्वर किट विद्यापीठात दिनांक 26 ते 29 डिसेंबर दरम्यान होणारी अखिल भारतीय योग स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठ योग संघात निवड झाली आहे .
केवळरामजी हरडे वाणिज्य महाविद्यालयात योग प्रशिक्षक प्रा डॉ महेश जोशी यांच्या प्रशिक्षणात आज पर्यंत विविध विद्यार्थ्यांनी योग स्पर्धेत प्राविण्य मिळविलेले आहे .
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गोंडवाना विद्यापीठाचा मुले व मुलींचा संघ 24 डिसेंबर ला प्रा डॉ महेश जोशी आणि प्रा संतोष शर्मा यांच्या सह ओडीशा राज्यातील भुवनेश्वर येथे सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहे .
भुषण नंदगीरवार याच्या अखिल भारतीय योगासन स्पर्धेतील सहभागा मुळे चामोर्शी परिसरातील विद्यार्थ्यांना मध्ये योग खेळाचा प्रचार प्रसार होण्यास मदत मिळेल असा विश्वास प्रशिक्षक प्रा डॉ महेश जोशी यांनी व्यक्त केला.
भुषण याच्या या उपलब्धी बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हिराजी बनपूरकर तसेच संस्थेचे अध्यक्ष अरुणभाऊ हरडे ,सचिव सौ डॉ स्नेहा हरडे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Previous articleसभोवतालच्या व देशातील सामाजिक, आर्थीक व राजकिय स्थीतीची जाणीव असणे गरजे — डॅा. नामदेव किरसान.
Next articleनिफाड सहकारी कारखाना भव्य नूतनीकरण सोहळा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.