Home सोलापूर संविधान दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या 2 शाखांचे उद्घाटन संपन्न

संविधान दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या 2 शाखांचे उद्घाटन संपन्न

122

आशाताई बच्छाव

IMG-20221204-WA0003.jpg

संविधान दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या 2 शाखांचे उद्घाटन संपन्न

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

आम आदमी पार्टी, युवा आघाडी सोलापूर कडून संपूर्ण जिल्हाभर गाव तिथं शाखा हा उपक्रम राबविला जात आहे.लोंढे वस्ती टेंभुर्णी, व उजनी (मा) या दोन शाखांचे उद्घाटन आम आदमी पार्टी युवा आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्ष गगन गोडसे सर, जिल्हा सचिव योगेश शिंदे , युवा तालुकाध्यक्ष सूरज शिंदे, उपाध्यक्ष महारुद्र तोडकर, सचिव अनंत घळके सर,टेंभुर्णी शहर युवा अध्यक्ष स्वप्नील लोंढे, उपाध्यक्ष सागर पाटील, सचिव शुभम हवालदार, फूटजवळगाव शाखा अध्यक्ष योगेश नवले, उपाध्यक्ष विकास निकम,सचिव सचिन नवले, काशिम मुलाणी, नंदकुमार साळुंखे, रांजनी शाखा अध्यक्ष सोमनाथ बागल, नवलचंद लोंढे नवनियुक्त शाखा पदाधिकारी यांच्या उपस्थित पार पडले. आम आदमी पार्टीच्या 10 वा वर्धापन दिवस हा देखील आजच असल्याने या शाखा उद्घाटनाला महत्त्व प्राप्त झाले.
यावेळी लोंढे वस्ती व पाटील वस्ती शाखा अध्यक्ष पदी सत्यवान पाटील यांची निवड करण्यात आली. तर उजनी (मा) शाखा अध्यक्ष पदी समाधान लोकरे यांची निवड करण्यात आली. यावेळी संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. युवा आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्ष गगन गोडसे सर यांनी संविधानाबद्दल माहिती सांगून कार्यक्रमाचा घोषणा देऊन शेवट केला.

Previous articleपंढरपूर तालुका विधी सेवा प्राधिकरणातर्फे संविधान दिन साजरा
Next articleसमता पर्व निमित्त समाज कल्याण कार्यालयात युवा गटाची कार्यशाळा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.