Home सोलापूर पंढरपूर तालुका विधी सेवा प्राधिकरणातर्फे संविधान दिन साजरा

पंढरपूर तालुका विधी सेवा प्राधिकरणातर्फे संविधान दिन साजरा

39
0

आशाताई बच्छाव

IMG-20221204-WA0002.jpg

पंढरपूर तालुका विधी सेवा प्राधिकरणातर्फे संविधान दिन साजरा

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

पंढरपूर तालुका विधी सेवा प्राधिकरण व अधिवक्ता संघ पंढरपूर यांच्यावतीने जिल्हा व सत्र न्यायालय पंढरपूर येथे संविधान दिन साजरा करण्यात आल. यावेळी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम. बी.लबे. न्यायाधीश ए.ए खंडाळे, न्यायाधीश एस.ए. साळुंखे, अतिवक्ता संघाचे अध्यक्ष अँड भगवान मुळे, उपाध्यक्ष श्री. नाईकनवरे, विधी स्वयंसेवक श्री यारगट्टीकर तसेच न्यायालयीन अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्रातिकीकरण,
सोलापूर डॉ.श्री. शब्बीर अहमद ओटी, जिल्हा विधी सेवा प्राधिकीकरण, सचिव नरेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार संविधान दिन साजरा करण्यात आला . यावेळी जिल्हा न्यायाधीश लंबे म्हणाले संविधान आहे म्हणून प्रत्येक नागरिकांनी हक्क व अधिकारबाबत जागरूक असताना आपल्या कर्तव्य पालनाची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. संविधानामध्ये जे आपल्या हक्क व कर्तव्य दिले आहेत. त्या सगळ्यांचा आत्मा उद्देशिका आहे. जेव्हा आपल्यावर काही प्रसंग येतो. त्यावेळी आपल्याला न्याय मिळावा यासाठी आपण न्यायालयात जातो. न्याय देताना सर्वच न्यायालय संविधान समोर ठेवून आपल्या प्रत्येक हक्काबाबत न्यायालय निर्णय घेत असते त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी न्यायाधीश ए.ए. खंडाळे न्यायाधीश एस.ए साळुंके यांनी संविधान दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी संविधानाच्या उद्देशिकेच वाचन करण्यात आले

Previous articleवाढते अपघात रोखण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना कराव्यात- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर.
Next articleसंविधान दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या 2 शाखांचे उद्घाटन संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here