Home सोलापूर वाढते अपघात रोखण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना कराव्यात- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर.

वाढते अपघात रोखण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना कराव्यात- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर.

114
0

आशाताई बच्छाव

IMG-20221202-WA0050.jpg

वाढते अपघात रोखण्यासाठी प्राधान्याने उपाययोजना कराव्यात- जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर.

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

अपघातांमध्ये झालेली वाढ रोखण्यासाठी सर्वविभागांनी प्राधान्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. वेगमर्यादेसाठी महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून वित्तीय तरदुद करण्याचा प्रयत्न करण्यात येईल ,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे केले
जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकीकरण सोलापूरचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सोलापूर शहराचे पोलीस निरीक्षक व्ही.बी.सिद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक अध्यक्षक अभिता अश्विनी वाडकर, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी आदि उपस्थित होते. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकीकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी त्यांच्या अखत्यारीतील रस्त्यावर गतिरोधक, वेगमर्यादाचे व दिशादर्शक सूचना फलक लावावेत, अशा सूचना करून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, प्राणांतिक अपघात वाढल्यामुळे विभागांनी बेशिस्त वाहनचालकावर कडक कारवाई करावी महामार्गावर रस्ता दुभाजक फोडणाऱ्या हॉटेल, ढाबा चालक, नागरिकांवर गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट निर्देश त्यांनी पोलीस विभागाला यावेळी दिले जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, अपघातांची आकडेवारी व त्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा संबंधित यंत्रणांनी अभ्यास करावा. हेल्मेट वापरण्यासंबंधी तसेच वाहतुकीच्या नियमासंबंधी प्रबोधन करावे. अपघात प्रवण( ब्लॅक स्पॉट) संदर्भात पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. सोलापूर जिल्ह्यातील अपघातांचे आय रँड( इंट्रीग्रेटड रोड एक्सीडेंट डाटा बेस) ॲप मध्ये माहिती भरण्याचे काम 97
टक्केपर्यंत पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

Previous articleझिंगानूर आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर आविसंचा झेंडा रामाजी आत्राम अध्यक्ष तर बाबुराव कुम्मरी उपाध्यक्ष
Next articleपंढरपूर तालुका विधी सेवा प्राधिकरणातर्फे संविधान दिन साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here