आशाताई बच्छाव
आनंदाचा शिधा नव्हे चॉकलेट..!जिल्ह्यात अनेक गावांत शिधा मिळालाच नाही; लाभार्थ्यांची दिवाळी कोरडीच..
स्वप्निल देशमुख
शिंदे फडणवीस सरकारने दिवाळीच्या तोंडावर आनंदाचा शिधा म्हणून देण्यात येणारी किट बहुतांश जिल्हावासियांसाठी मात्र चॉकलेट ठरली आहे. आज भाऊबीज असली तरी जिल्ह्यातील ७५ टक्के लाभार्थ्यांना अजूनही आनंदाचा शिधा मिळालाच नाही.१०० रुपयांत रवा, तेल, साखर आणि चणाडाळ असा हा शिधा मिळणार होता, तसा वादा राज्य सरकारने केला होता मात्र सरकारचा हा वादा फोल गेल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २५ टक्के लाभार्थ्यांची दिवाळी गोड झाली आहे. जिल्ह्यात ४ लाख ८८ हजार ८ कुटुंब शिधा मिळवण्यासाठी पात्र आहे. त्यानुसार शिधा वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र राज्य शासन आणि पुरवठा विभागाचा ताळमेळ नसल्याने अनेक कुटुंबांना अजून शिधा मिळालेला नाही. २५ टक्के कुटुंबांनाच दिवाळीत आनंदाच्या किट च्या भवश्यावर गोडधोड बनवता आले. अनेक ठिकाणी अजून चणाडाळ उपलब्ध झालेली नाही, त्यामुळे अजून किटचे
अनेक ठिकाणी अजून चणाडाळ उपलब्ध झालेली नाही, त्यामुळे अजून किटचे वाटप रखडले आहे.






