Home नांदेड दिवाळी निमित्त शासनाच्या वतीने उंद्री प.दे. येथील स्वस्त धान्य दुकानात आनंदाचा शिधा...

दिवाळी निमित्त शासनाच्या वतीने उंद्री प.दे. येथील स्वस्त धान्य दुकानात आनंदाचा शिधा किटचे वाटप.

153

आशाताई बच्छाव

IMG-20221024-WA0099.jpg

दिवाळी निमित्त शासनाच्या वतीने उंद्री प.दे. येथील स्वस्त धान्य दुकानात आनंदाचा शिधा किटचे वाटप.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड – राज्यातील गोरगरिबांच्या घरी ही दिवाळी आनंदात साजरी व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने आनंदाचा शिधा ही विशेष योजना राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविण्यात यश मिळवले आहे. स्वस्त धान्य दुकानातून जे लोक धान्य घेतात त्यांना अवघ्या शंभर रुपयात एक किलो साखर, एक किलो रवा, एक किलो चणाडाळ,एक लिटर पामतेल अशी किट शासनाने उपलब्ध करून दिली. गोरगरिबांच्या घरात ही महाराष्ट्र सरकारने दिवाळीची दिलेली ही गोड भेट असून मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथील एकनाथराव मल्हारराव नाईक हसनाळ प.दे. जोड स्वस्त धान्य दुकान उंद्री प.दे. येथे आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी रवींद्र पवार,राजू अडबलवार, राजू पाटील सूर्यवंशी (दुकानदार),दयानंद सोनकांबळे, उमेश सोनकांबळे,राजू वाघमारे, गोरख सोनकांबळे, गणेश शिरगिरे, गुंडाजी पाटील सूर्यवंशी, धनाजी पाटील पसारे, शिवाजी सकरगे, पत्रकार मनोज बिरादार यांच्यासह असंख्य कार्डधारक लाभार्थी उपस्थित होते.

Previous articleपुणे जिल्ह्यात २४ लाखाची चोरी करणारी टोळी जेरबंद
Next articleमहात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील करीयर कट्टा ग्रुपच्या 26 विद्यार्थ्यांची नोकर भरती क्षेत्रात उत्तुंग भरारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.