Home बुलढाणा कॉलेज ला गेलेली युवती बेपत्ता

कॉलेज ला गेलेली युवती बेपत्ता

167

आशाताई बच्छाव

Screenshot_20221013-061236_Google.jpg

कॉलेज ला गेलेली युवती बेपत्ता
मोताळा,(संजय पन्हाळकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- खामगाव येथे कॉलेजला जाते .असे सांगून गेलेली युवती बेपत्ता झाल्याची घटना शेम्बा येथे गुरुवारी घडली. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी मंगळवारी ( 8) संबधीत युवती हरवल्याची नोंद केली आहे
नांदुरा तालुक्यातील शेम्बा येथील ईश्वर सुखदेव इंगळे ( 32 ) यांनी बोराखेडी पोलिसांत फिर्याद दिली की ,त्याची मेहुनी पल्लवी गजानन तायडे ( 20 रा वतपाल टाकळी ता. नांदुरा ह.मु.शेम्बा ) ही खामगाव येथे कॉलेजला जाते असे सांगून सोमवारी ता 8 सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घरून निघून गेली. परंतु अद्यापही घरी परत आली नाही . तिच्या मैत्रिणी व नातेवाईक व आजूबाजू च्या परिसरात शोध घेतला असता ,मिळून आली नाहीं. या प्रकरणी उपरोक्त फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी संबधीत युवती हरवल्याची नोंद केली आहे पल्लवीचा रंग गोरा , उंची पाच फूट पाच इंच , शरीर बांधा मजपुत, अंगात पंजाबी ड्रेस व पायात सॅंडल घातलेली आहे

Previous article!!शांतीग्राम ता.मुलचेरा या गावातील बैठकीच्या माध्यमातून समस्या जाणून घेतल्या!!. खा.अशोकजी नेते,
Next articleशेतरस्त्याच्या वादातून मायलेकाला मारहाण दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल ,कोथळी शिवारातील घटना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.