Home सोलापूर पंढरपूर प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा.

पंढरपूर प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा.

121

आशाताई बच्छाव

IMG-20221010-WA0025.jpg

पंढरपूर प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना दिलासा.

माढा प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकम (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

पंढरपूर येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या घरांच्या प्रश्ना संदर्भात मनसे नेते दिली धोत्रे यांनी गुरुवारी पंढरपूर नगरपालिकेतील मुख्य अधिकारी यांच्या दालनामध्ये उपमुख्य अधिकारी सुनील वाळूजकर नगरपालिका बांधकाम अभियंता पवार यांच्याबरोबर सर्व लाभार्थ्यांना घेऊन चर्चा केली या चर्चे वेळी घरे मिळवण्यासाठी आजवर नेमकी अडचण काय होती. याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यापूर्वी नगरपालिकेने लाभार्थ्यांना तीस वर्षाच्या करारावरच घर देण्यात येतील अशी अट घातली होती, त्यामुळे लाभार्थ्यांना ही अट रद्द करण्याची मागणी नगरपालिकेकडे आम्ही केली होती त्या मागणीचा विचार करून कवडे, नगरपालिकेकडे ती अट रद्द केली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना बँकेचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तसेच बंद पडलेल्यघरांचे ताबडतोब चालू करून येत्या दिवाळीत घराचा ताबा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. या मागणीनुसार नगरपालिकेने लेखी पत्र दिले असून नगरपालिका लवकरच काम चालू करेल असे पत्र त्यांनी दिले आहे. परंतु येत्या 18 तारखेपर्यंत जर नगरपालिकेने पंतप्रधान आवास योजनेचे काम चालू नाही केले तर सर्व लाभार्थ्यांना घेऊन आम्ही घराचा ताबा घेणार आहोत. यावेळी कोळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुण भाऊ कोळी, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किरण राजघाडगे, मनसेचे पंढरपूर शहराध्यक्ष संतोष कवडे,
तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, मनसेचे उपशहर अध्यक्ष गणेश पिंपळनेर, विवेक बेणारे सर्व लाभार्थी बांधव उपस्थित होते

Previous articleमहाराष्ट्र संघ दुहेरी मुकुटाचा मानकरी फेडरेशन चषक रोलबॉल स्पर्धा : उत्तर प्रदेश, राजस्थान उपविजेते
Next articleसावळी येथील पूलाचे बांधकाम भूमिपूजन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.