Home नाशिक नांदगांव येथील कृषी बाजा र समितीत, भगवान वीर एकलव्य, यांच्या 81 मूर्तीचे पूजन...

नांदगांव येथील कृषी बाजा र समितीत, भगवान वीर एकलव्य, यांच्या 81 मूर्तीचे पूजन करण्यात आले.

246

आशाताई बच्छाव

IMG-20221001-WA0046.jpg

नांदगांव येथील कृषी बाजा र समितीत, भगवान वीर एकलव्य, यांच्या 81 मूर्तीचे पूजन करण्यात आले.

नांदगाव,(प्रतिनिधी आनिल धामणे)- येथे उभारलेल्या सभा मंडपाच्या प्रवेशद्वारावर भव्यदिव्य अशी शिव शंकराची मूर्ती ठेवण्यात आल्याने आलेल्या जनतेचे लक्ष वेधीत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नवनिर्वाचित पालकमंत्री दादा भुसे,आमदार सुहास कांदे, समाजसेविका सौ.अंजुम सुहास कांदे याचे मोठमोठे कटाऊट लावण्यात आले होते.
या वेळी आलेल्या आदिवासी बांधवांचा सन्मान आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन बापू साहेब कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली, नांदगाव विधानसभेचे आमदार, सुहास कांदे यांनी केले होते.
मतदारसंघातील सर्व आदिवासी वस्तीवरील आदिवासी बांधवांचा सामूहिक सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

आमदार निधी अंतर्गत प्रत्येक वस्तीवर भव्य सभामंडप निधी,वीस लाख रुपये मंजूर करण्यात आला असून, प्रत्येक सभा मंडपात आमदार सुहास कांदे यांच्या स्वखर्चातून भगवान वीर एकलव्य महाराजांची मूर्ती या वेळी भेट देण्यात आली.

या कार्यक्रमात 81एकलव्य मूर्तींची होम हवन करून, विधिवत पूजा करण्यात आली होती.165 आदिवासी कुटुंबीयान कडून संत महंतांच्या उपस्थितीत, विधिवत पूजन करण्यात आले.
या पूजेला आमदार सुहास कांदे समाजसेविका सौ.अंजुम कांदे यांच्या हस्ते देखील विधिवत पूजन करण्यात आले
नांदगाव मतदार संघात आदिवासी समाजासाठी पहिल्यांदा असा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
तालुक्यातील प्रत्येक आदिवासी पाड्यावर येत्या 6 महिन्यात चांगले वाचनालय व व्यायामशाळा उभारण्यात येणार असल्याचे आमदार सुहास कांदे यांनी या वेळी बोलतांना सांगितले आहे.

या कार्यक्रमात व्यासपीठावर तालुक्यातील शिवसेनेचे, भाजपाचे,पदाधिकारी,कार्यकर्ते व आदिवासी समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
अनिल धामणे, नांदगाव.नाशिक

Previous articleखा. संजय जाधव यांच्या हस्ते भोगाव देवी येथे सभामंडप कामाचे उद्घाटन
Next articleविठ्ठल मंदिराच्या भिंतीवर उगवलेल्या झाडांमुळे भिंतींना धोका.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.