Home कोल्हापूर वडगावच्या एकाला पाच लाखांना गंडा

वडगावच्या एकाला पाच लाखांना गंडा

143

आशाताई बच्छाव

IMG-20220917-WA0037.jpg

वडगावच्या एकाला पाच लाखांना गंडा

पेठ वडगाव/कोल्हापूर  राहुल शिंदे: ऑनलाइन पाच लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी वडगाव पोलिस ठाण्यात् चार जणावर गुन्हा दाखल झाला.याप्रकरणी हर्षल एस परमार,डिंपी सतपती, दिव्या सक्सेना, अशिष दिक्षित(सर्व पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.दीपक धन्यकुमार उपाध्ये(रा.पेठवडगांव,ता.हातकणंगले) यांनी फिर्याद दिली.उपाध्ये पुण्यातील एका कंपनीत कामाला आहेत. सध्या वर्क फ्रॉम होम वर काम करत आहेत.पुण्यातील परमार, सतपति ,सक्सेना आणि दीक्षित यांनी विमा पॉलिसी चा एजंट कोड हटवून स्वतःचा कोड लावला.त्यानंतर वार्षिक हप्ता कमी होऊन इतर फायदे मिळतील असे आमिष दाखवून पाच लाख रुपये बँक खात्यातून ऑनलाईन स्वीकारून फसवणूक केली.याबाबत पेठ वडगाव पोलिस ठाणयात गुन्हा दाखल झाला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील, हवालदार पतंगराव रेणुसे करीत आहेत.

Previous articleसेवा पंधरवाडयात नागरिकांची कामे कालमर्यादेत मार्गी लावावीत – जिल्हाधिकारी आंचल गोयल
Next articleऔरंगाबादला प्रधानमंत्री उद्योजकता महारोजगार मेळाव्याचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.