Home मराठवाडा आज ७५ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

आज ७५ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

154

आशाताई बच्छाव

IMG-20220917-WA0012.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: आज ७५ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन! आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन ७५ वा साजरा होत आहे. या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी औरंगाबाद या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम च्या हुतात्म्यांना आदरांजली व्यक्त केली . त्यांनी सांगितले की मराठवाड्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे .त्यासाठी लागेल तेव्हा निधी मी देण्यासाठी तयार आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा दरवर्षी उत्साहात सादर होत आहे असे सांगितले. आजचा दिवस विकासाचा संकल्प घेण्याचा आहे असे त्यांनी सांगितले. यावरती शिवसेनेने मुख्यमंत्र्यावरती टीका केली आहे. शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले की पहिल्यांदाच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या वेळेत बदल करण्यात आला, सकाळी नऊ वाजता ध्वजारोह होत असताना ते यावर्षी सात वाजता करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन याला वेळ द्यावा अशी आमची इच्छा होती, परंतु त्यांनी वेळेत बदल करून तो या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा एक प्रकारे अपमानच केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शिवसेना व शिंदे गट हे आमने-सामने आले असे दिसून आले. एकंदरीतच मराठवाडा मुक्ती संग्राम दिन औरंगाबाद या ठिकाणी खूप उत्साहात पार पडत आहे असे दिसून आले.

Previous articleनरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ताहाराबाद येथे विविध कार्यक्रम.
Next articleयोग,आयुर्वेद, स्वदेशी प्रोडक्ट वर बदनामीसाठी धार्मिक दहशतवाद!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.