Home नागपूर बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्‍या महाराष्ट्र चॅप्टरच्या पहिल्‍या विदर्भ नियामक मंडळाची कार्यकारिणी जाहीर

बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्‍या महाराष्ट्र चॅप्टरच्या पहिल्‍या विदर्भ नियामक मंडळाची कार्यकारिणी जाहीर

127

आशाताई बच्छाव

IMG-20220916-WA0031.jpg

बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्‍या महाराष्ट्र चॅप्टरच्या पहिल्‍या विदर्भ नियामक मंडळाची कार्यकारिणी जाहीर
अजय पाटील यांची विदर्भ केंद्राध्‍यक्षपदी निवड
नागपूर, 16 सप्‍टेंबर
बांबू सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र चॅप्टर , विदर्भ केंद्राची बैठक नुकतीच महाराष्‍ट्र राष्‍ट्रभाषा सभा, वोक्‍हार्ट हॉस्पिटलच्‍या मागे, शंकर नगर येथे पार पडली. यात विदर्भ केंद्राच्‍या पहिल्‍या नियामक मंडळाची कार्यकारिणी निवड करून जाहीर करण्‍यात आली असून विदर्भ केंद्राध्‍यक्षपदी अजय पाटील यांची निवड करण्‍यात आली आहे.
अजय पाटील हे वनराई फाउंडेशनचे विश्वस्त असून महाराष्‍ट्र राज्‍य वनरक्षक व पदो. वनपाल संघटनेचे अध्‍यक्ष, महाराष्‍ट्र राज्‍य वन विकास महामंडळ कर्मचारी व अधिकारी संघटनेचे अध्‍यक्ष, एशियाटीक बिग कॅट सोसायटीचे अध्‍यक्ष तसेच, महाराष्‍ट्र राष्‍ट्रभाषा सभाचे विदर्भ विभागाचे अध्‍यक्ष आहेत. वन आणि पर्यावरण क्षेत्रात त्‍यांचे भरीव योगदान आहे.
या बैठकीत आर्किटेक्‍ट आशिष नागपूरकर यांची कार्यकारी संचालकपदी, इंजिनीयर आशिष कासवा यांची सचिव व कोषाध्‍यक्षपदी निवड करण्‍यात आली तर डॉ. विजय इलोरकर, डॉ. विजय घुगे, रमेश डुंभरे, अॅड. राजीव देशपांडे हे सदस्‍य राहतील.
बांबू सोसायटी ऑफ इंडिया विदर्भ चॅप्‍टरच्या सदस्यांनी विदर्भात बांबू नर्सरीपासून ते उद्योगापर्यंतच्‍या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा तसेच, कृषी-वनीकरण-तांत्रिक विकासासाठी सर्व प्रकारचे सहाय्य प्रदान करण्याचा यावेळी संकल्प केला.
बांबू सोसायटी ऑफ इंडिया महाराष्‍ट्र चॅप्‍टरचे संस्‍थापक आर्किटेक्‍ट सुनील जोशी हे या बैठकीचे संयोजक होते. त्‍यांनी सभेला संबोधित करताना विदर्भ चॅप्‍टरच्‍या स्‍थापनेची गरज प्रतिपादित केली. हे केंद्र विदर्भात बांबू क्षेत्राच्‍या प्रचार व प्रसार करण्‍यासाठी मदत करेल, असे ते म्हणाले.
अजय पाटील यांनी अध्‍यक्षपदाचा पदभार स्‍वीकारताना बांबू क्षेत्राच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्‍न करण्‍याचे सांगितले. तसेच, महाराष्‍ट्र शासनाच्‍या महाराष्‍ट्र बांबू विकास मंडळासोबत विविध उपक्रम राबविण्‍यात येतील व शेतकरी व या क्षेत्राशी संबंधितांच्‍या विकासासाठी प्रयत्‍न केले जातील. बांबू लागवडी संदर्भात शेतक-यांना सातत्‍याने मार्गदर्शन करण्‍यात येईल, असे सांगितले. त्‍यांनी या नियुक्‍तीसाठी सर्वांचे आभार मानले.
उपस्थित सदस्यांमध्ये दीपक सुने, आर. एस. डवलकर, रवी नाफडे, आर्किटेक्‍ट महेश मोखा, आर्किटेक्‍ट अनंत खारपटे, प्रा. उदय गडकरी, आर्किटेक्‍ट गणेश हरीमकर, प्रताप गोस्वामी, सुरिंदर पाल सिंग, विराज जोशी, डॉ. देबारती दत्ता, इंजिनीयर सादिक अमीन, राजेंद्र जगताप, इरफान अहमद, उमेश निनावे, आर्किटेक्‍ट प्राची झाडे यांचा समावेश होता.
नवनियुक्त अध्यक्षांनी उपस्थितांचे आभार मानले .

Previous articleसंदीप कवळे यांना पुरस्कार जाहिर
Next articleयुवा मराठा न्युजचे प्रतिनिधी काकासाहेब सांळुके यांची शालेय व्यवस्थापन समितीवर अध्यक्षपदी निवड! _________________
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.