Home नाशिक मालेगाव येथून सांयकाळी ७ वाजेनंतर बस सुरू करावी यासाठी व्यापारी संघटनेचा आंदोलनाचा...

मालेगाव येथून सांयकाळी ७ वाजेनंतर बस सुरू करावी यासाठी व्यापारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

267

आशाताई बच्छाव

IMG-20220915-WA0023.jpg

मालेगाव येथून सांयकाळी ७ वाजेनंतर बस सुरू करावी यासाठी व्यापारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे

मालेगाव येथून नांदगाव येथे येण्यासाठी सांयकाळी ७ वाजेनंतर एकही बस नसल्याने नांदगाव व्यापारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
याबाबत वृत असे की नांदगाव शहराचे आर्थीक दळणवळण मालेगाव शहराशी निगडीत आहे. विविध आजारा वरील दवाखाने मालेगाव येथे आहे तसेच किराणा मालाची मोठी बाजारपेठ सोयगाव व टेहरे येथे आहे. नांदगाव शहरातून मोठा व्यापारी वर्ग मालेगाव शहराशी निगडीत असून रोज या ठिकाणी बरेचशे व्यापारी विविध सामान खरेदी करण्यासाठी ये जा करीत असतात . तसेच विविध आजारा वरील पेशंट या ठिकाणी नियमीत तपासणी साठी ये. जा करीत असतात . असे असतानां सांयकाळी ७ वाजेनंतर एकही बस मालेगाव येथून नांदगावला येण्यासाठी नाही.या अगोदर सदर बससेवा सुरु होती. पंरतू कोवीड च्या आपद्ग्रस्त स्थितीत सदर बससेवा बंद झाली होती . त्यामुळे प्रवाशी वर्गाचे मोठया प्रमाणावर हाल होत आहे. बरेचशा प्रवाशाना रात्री ७ वाजेनंतर मनमाड मार्गे नांदगाव येथे यावे लागते तरी नांदगाव आगाराने प्रवाशांच्या भावनाचा विचार करून त्वरीत सांयकाळी ७ वाजे नंतर ८ व ९ वाजता मालेगाव हून नांदगाव ला येण्यासाठी बस सुरू करावी अन्यथा रस्ता रोको सारखे मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचे निवेदन नांदगाव शहर व्यापारी संघटनेने नांदगाव आगार प्रमुखांना दिले . निवेदनावर प्रकाश कंळत्री ‘ विजय चोपडा यांची स्वाक्षरी आहे .

Previous articleयुनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विमा कंपनीशी फोन द्वारे संपर्क होत नसल्याने शेतकरी वर्गातून संताप.
Next articleनांदगाव-भालूर बस सेवा सुरु करण्यासाठी युवा सेनेचे डेपो मॅनेजर यांना निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.