Home नाशिक नांदगाव-भालूर बस सेवा सुरु करण्यासाठी युवा सेनेचे डेपो मॅनेजर यांना निवेदन

नांदगाव-भालूर बस सेवा सुरु करण्यासाठी युवा सेनेचे डेपो मॅनेजर यांना निवेदन

254

आशाताई बच्छाव

IMG-20220915-WA0022.jpg

नांदगाव-भालूर बस सेवा सुरु करण्यासाठी युवा सेनेचे डेपो मॅनेजर यांना निवेदन

नांदगाव ( प्रतिनिधी अनिल धामणे) नांदगाव ते भालुर मार्गावरील विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करणे व बसचा वेळ बदलणे बाबत युवसेनेतर्फे डेपो मॅनेजर यांना निवेदन देण्यात आले त्यात म्हटले आहे की युवासेना शाखा भालुर तर्फे आपणास निवेदन देतो कोविड – १९ लॉकडाऊन मध्ये १:३० वाजता नांदगाव ते भालुर बस चालू होती ती बंद झाली होती.

पण लॉकडाऊन उघडुन खूप दिवस झाले आहे पण बस सेवा अजून सुरू झालेली नाही त्यामुळे नांदगाव ते भालुर मार्गावरील सर्वच नांदगाव कॉलेजच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होतेय व दुपारी ३ वाजता जी बस आहे तिचा वेळ नांदगाव वरून ४ वाजता करावा कारण काही विद्यार्थ्यांचे कॉलेज ३ ला सुटते त्यामुळे त्यांना ती बस मिळत नाही त्यामुळे त्यांना इतर वाहनांच्या साह्याने यावे लागते मुलींना कधी कधी ५-६ किमी पायी यावे लागते तरी आपण आम्हाला सहकार्य करावे . ह्या पैकी भरपूर विद्यार्थ्यांनी आपल्या कडे निवेदन हि दिले होते पण त्याची दखल घेतली गेली नाही. तरी आम्ही आपणास कळकळीची विनंती करतो की आपण आमच्या निवेदनाची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर बस सेवा सुरू करावी. असे निवेदन करण्यात आले . याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख संतोषजी गुप्ता , युवासेना भालुर तर्फे आदेश शिंदे व सौरभ निकम उपस्थित होते . त्यासोबत विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरी चे पत्रक जोडले होते

Previous articleमालेगाव येथून सांयकाळी ७ वाजेनंतर बस सुरू करावी यासाठी व्यापारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
Next articleगरजु निराधार विद्यार्थी, यांच्या बरोबर साजरा केला दिप्ती, जोशी ने वाढदिवस
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.