Home रत्नागिरी जिल्हाधिकार्‍यांच्या “सागर दर्शन” निवासस्थानी ’श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा

जिल्हाधिकार्‍यांच्या “सागर दर्शन” निवासस्थानी ’श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा

155

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0046.jpg

जिल्हाधिकार्‍यांच्या “सागर दर्शन” निवासस्थानी ’श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा                                              रत्नागिरी,(सुनील धावडे)

रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्याला जिल्हाधिकरी डॉ. बी. एन. पाटील व पत्नी सौ. स्मिता पाटील यांच्या हस्ते यावेळी पूजा, आरती करण्यात आली.

रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी गणरायाची छोटेखानी आकर्षक श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळावी तसेच सर्व जनतेचे आरोग्य सुखसमृद्ध असावे, शेती उद्योगधंदे यामध्ये भरभराट व्हावी, असे साकडे घालतानाच जनतेला सुखी समृद्ध समाधानी ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी गणरायाला साकडे घातले. जिल्ह्‌यामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होत असतानाच नुकतेच दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन पारंपारिक पद्धतीने करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्‌यामध्ये विविध शहरामधून पर्यावरण पूरक असे तलाव करण्यात आले होते. यापुढील गणेश विसर्जनालाही अशाच पद्धतीने पर्यावरणपूरक तलावामध्ये नागरीकांनी गणरायाचे विसर्जन करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Previous articleलांजा-कनावजेवाडी रस्त्यावर आढळून आले खवले मांजर; तरुणांच्या सतर्कतेमुळे खवले मांजराचे वाचले प्राण
Next articleगणपतराव ब्रिद माध्यमिक विद्यालय तांबडी चे मुख्याध्यापक एकनाथ राऊत सेवानिवृत्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.