Home रत्नागिरी कोरोना काळात ग्रामस्थांमधील गैरसमज दूर करण्यासाठी चवे ग्रापंचायतीची ग्रामस्थ व चाकरमानी संवाद...

कोरोना काळात ग्रामस्थांमधील गैरसमज दूर करण्यासाठी चवे ग्रापंचायतीची ग्रामस्थ व चाकरमानी संवाद सभा संपन्न

121

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0056.jpg

कोरोना काळात ग्रामस्थांमधील गैरसमज दूर करण्यासाठी चवे ग्रापंचायतीची ग्रामस्थ व चाकरमानी संवाद सभा संपन्न                                              रत्नागिरी,(सुनील धावडे)

कोरोना काळात येणाऱ्या गावी येणाऱ्या चाकरमान्यांना काही नियमांना सामोरे जावे लागले होते. यातून काही जणांमध्ये नाराजी होती. ही नाराजी दूर करण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील चवे गावच्या ग्रामपंचायतीने विद्यमान सरपंच दीपक गावणकर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी यासाठी सभा आयोजित करून चाकरमान्यांशी संवाद साधला.

गेली 2 वर्ष कोरोना सारख्या आजाराशी संपूर्ण जग लढत होत. या महामारीशी लढत असताना असताना काही नियमांचे काटेकोर पालन करावे लागत होते. त्यात चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले. या कोरोना कालावधीत ग्रामस्थ व चाकरमानी यांच्यातील वाद विकोपाला गेले होते. हा राग रुसवा, ग्रामस्थ व चाकरमानी यांच्यातून कायमस्वरुपी दूर व्हावा, ग्रामस्थ व चाकरमानी हौशी आनंदाने राहावेत म्हणून ग्रामपंचायत सरपंच दीपक गावणकर यांनी संवाद साधला.

लोकांना येणाऱ्या अडचणी प्रामाणिकपणे सोडवू असा शब्द त्यांनी यावेळी दिला. चाकरमान्यांना त्यांनी आपल्या गावाकडे पण लक्ष ठेवण्याची विनंती केली. ग्रा. प. सदस्य श्रीनिवास जोशी यांनी सुद्धा ग्रामस्थ व चाकरमान्यांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर चाकरमानी बहुसंख्येने उपस्थित राहिले याबद्दल त्यांचे आभार मानले.

Previous articleजिल्हा परिषद शाळा पिंगळवाडे येथे वाचन दिन साजरा.
Next articleकशेडी घाटात ट्रक दीडशे फूट खोल दरीत कोसळला ; चालक जखमी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.