Home नाशिक जिल्हा परिषद शाळा पिंगळवाडे येथे वाचन दिन साजरा.

जिल्हा परिषद शाळा पिंगळवाडे येथे वाचन दिन साजरा.

32
0

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0035.jpg

जिल्हा परिषद शाळा पिंगळवाडे येथे वाचन दिन साजरा.

संदीप गांगुर्डे
पिंगळवाडे
माणव संसाधन विकास मंत्रालय , शालेय शिक्षण विभाग व साक्षरता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळा येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यात विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यांचा ऑनलाइन,ऑफलाइन अभ्यास सहभाग घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या विद्यालयात स्वच्छता पंधरवाडा ही साजरा होत आहे यात शाळा परिसर विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी यांच्या सहकार्याने स्वच्छ करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांचे मौखीक आरोग्याचे मार्गदर्शन करण्यात आले. व विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व सांगण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी पटांगण अभ्यास कृती घेण्यात आली. तसेच सामूहिक वाचन विद्यार्थ्यांकडून घेण्यात आले. व्यक्तिगत वाचन ही आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांकडून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली व त्याचे पालन व्हावे असे मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे मार्गदर्शक मुख्याध्यापक घुडकु गांगुडेॅ होते. तसेच शिक्षक राजेंद्र देवरे, अनुपमा निकम, मनीष शेवाळे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी उपस्थिती होती त्यात माधव गांगुर्डे, प्रकाश भामरे, सुनील कोठावदे, नंदकिशोर कोठावडे.आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Previous articleअटक वारंटी मध्ये करण्या साठी लाच स्वीकारताना पोलीस अँटी करप्शनच्या जाळ्यात.
Next articleकोरोना काळात ग्रामस्थांमधील गैरसमज दूर करण्यासाठी चवे ग्रापंचायतीची ग्रामस्थ व चाकरमानी संवाद सभा संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here