Home गडचिरोली ग्रामविकास अधिकारी विक्रमपुर यांची तात्काळ बदली करा आमदार डॉ देवरावजी होळी यांना...

ग्रामविकास अधिकारी विक्रमपुर यांची तात्काळ बदली करा आमदार डॉ देवरावजी होळी यांना विक्रमपुर ग्रामवासियांचे निवेदन

146

आशाताई बच्छाव

IMG-20220902-WA0022.jpg

ग्रामविकास अधिकारी विक्रमपुर यांची तात्काळ बदली करा

आमदार डॉ देवरावजी होळी यांना विक्रमपुर ग्रामवासियांचे निवेदन                                           गडचिरोली,(सुरज गुंडमवार)

सातत्याने गैरहजर ,गावातील लोकांना दाखले न देणे, अकारण त्रास देणे, कामांमध्ये अनियमितता आठवड्यातून केवळ १ कामावर येत असल्याचा ग्रामस्थांचा आहे

मौजा विक्रमपूर येथील ग्रामविकास अधिकारी हे अत्यंत निष्क्रिय असून आपल्या कर्तव्यावर कधी हजर राहत नाही त्यांच्या कार्यकाळात झालेल्या अनेक कामात अनियमितता असल्याने त्यांची गावातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून विक्रमपूर ग्रामवासियांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे केली.

यावेळी विक्रमपूरचे उपसरपंच प्रभास सरकार यांचे सह विक्रमपूर येथील ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.
गावाच्या विकासासाठी गावातील लोकांच्या सेवेसाठी ग्रामसेवकाची, ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे . मात्र विक्रमपूर येथील ग्रामविकास अधिकारी हे गावात कामावर न येता सातत्याने गैरहजर असतात. गावातील विद्यार्थी किंवा लोकांना दाखले देण्यास ते टाळाटाळ करतात . सर्वसामान्य लोकांना अकारण त्रास देतात. त्यांच्या कार्यकाळात गावातील विकास कामे योग्य प्रकारे झालेली नाहीत , त्या कामांमध्ये प्रचंड अनियमितता आहे . आठवड्यातून केवळ १ कामावर येणाऱ्या या ग्रामविकास अधिकाऱ्याची गावातून तातडीने हकालपट्टी करावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून विक्रमपूर ग्रामवसायांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्याकडे केली.