Home गडचिरोली नऊ हजाराची लाच घेताना विक्रमपूर येथील सरपंच अडकला एसीबीच्या जाळ्यात

नऊ हजाराची लाच घेताना विक्रमपूर येथील सरपंच अडकला एसीबीच्या जाळ्यात

86
0

आशाताई बच्छाव

20220902_151534-BlendCollage.jpg

नऊ हजाराची लाच घेताना विक्रमपूर येथील सरपंच अडकला एसीबीच्या जाळ्यात

चामोर्शी/गडचिरोली,(सुरज गुंडमवार) – तालुक्यातील विक्रमपूर येथील सरपंच श्रीकांत सत्यनारायण ओलालवार वय 46 वर्ष राहणार चामोर्शी आंबेडकर वार्ड क्रमांक सात येथील रहिवासी असून तालुक्यातील विक्रमपूर येथे सरपंच पदावर कार्यरत आहे. त्यांनी नवग्राम येथील तक्रारदाराकडून घरकुल योजनेत नाव नोंदवून घरकुलाचा लाभ मिळवून देण्याकरिता दहा हजार रुपयाची मागणी केली होती . मात्र तक्रारदारास लाच द्यायची इच्छा नसल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार तडजोडीअंती 9 हजार रुपयाची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात फसला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपुर. मा. मधुकर गीते, अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनात मा. सुरेंद्र गरड पोलीस उपअधीक्षक लाचलुतपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली,
पोलीस निरीक्षक शिवाजी राठोड, पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलीस हवालदार दत्तू धोटे, नापोशी राजेश पतंग गिरवा, नापोशी श्रीनिवास संगोजी, नापोशी किशोर ठाकूर, पो.शी. संदीप उडाल, म.पो.शी जोत्सना वसाके, चालक पोहवा तुळशीराम नवघरे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here