Home नाशिक गोदावरी एक्सप्रेस मध्य गणरायाचे आगमन             

गोदावरी एक्सप्रेस मध्य गणरायाचे आगमन             

191

आशाताई बच्छाव

IMG-20220901-WA0012.jpg

गोदावरी एक्सप्रेस मध्य गणरायाचे आगमन                    नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे :-                 राज्यात सर्वत्र गणरायाचे उत्साहात स्वागत होत असतानाच मनमाड- ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेस मध्येही गोदावरीचा राजा गणेशाची स्थापना करण्यात आली. गेल्या 26 वर्षापासून गणेश चतुर्थी निमित्त गोदावरी एक्सप्रेसमध्ये गणरायाची स्थापना करण्यात येते.राज्यात हा उत्सव प्रसिद्ध आहे. मात्र गेली दोन वर्षे कोरोनामुळे गणरायाची रेल्वेची मुंबई वारी हुकली होती. यंदा मात्र कोरोना नियम शिथिल झाल्याने गणरायाची दहा दिवस मुंबईवारी निश्चित झाली आहे प्रवासी संघटना व गोदावरीचा राजा ट्रस्टतर्फे पासधारक बोगीमध्ये वाजत गाजत उत्साहात गणपतीची स्थापना करण्यात आली. बोगीमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. रेल्वे सुरक्षा नियम व विज बचतीचे संदेश असलेले स्टिकर लावून जनजागृती करण्यात येत आहे.ब्रँडच्या तालावर गणेशभक्तांनी फेर धरला होता.देशातील सर्व प्रवाश्यांच्या प्रवास सुखाचा व्होवो असे साकडे गगणरायाला घालण्यात आले.