Home जालना समर्थांचे देव चोरणारे चोर ८ दिवसानंतरही मोकाटच!

समर्थांचे देव चोरणारे चोर ८ दिवसानंतरही मोकाटच!

210

आशाताई बच्छाव

IMG-20220830-WA0027.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: समर्थांचे देव चोरणारे चोर ८ दिवसानंतरही मोकाटच! जालना जिल्ह्यातील जाम समर्थ गाव हे समर्थांचे मूळ गाव .त्या ठिकाणी ८ दिवसापूर्वी राम, लक्ष्मण,सीता, भरत, शत्रुघन व हनुमान यांच्या पंचधातूंच्या मुर्त्या चोरीस गेल्या होत्या .त्यावरून समर्थ गावांमध्ये ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले आहे.८ दिवस झाले तरी चोर मोकाटच आहेत. अजून कोणालाही अटक झालेली नाही,त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आज सकाळी फोनवरून मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी जाम समर्थ गावकऱ्यांची संवाद साधला, चोरांना लवकरात लवकर पकडण्यात येईल असे आश्वासन सुद्धा दिले. या ग्रामस्थांच्या आंदोलनामध्ये तेथील मुस्लिम बांधवही सहभागी झालेले आहे. मुस्लिम बांधवांनी गावातील मशीदी मधून ही घोषणा केली .त्यांनी सांगितले की जाम समर्थ गाव हे आमच्यासाठी दैवत आहे हे देव चोरणाऱ्यांना चा आम्ही निषेध करतो. त्यांना लवकरात लवकर पकडण्यात यावी अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो.एकंदरीत काय तर चोर हे पोलिसांपेक्षा चालक आहेत हे नक्की.

Previous articleकास पठार होऊ लागले भकास!
Next articleसाडेतीन एकर उसाचा फड अचानक पेटला! गोपाळपूर नजीक उसाच्या शेतीला आग
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.