Home रत्नागिरी खड्डे बुजवण्याची मागणी गोट्या खेळत करत राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

खड्डे बुजवण्याची मागणी गोट्या खेळत करत राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

160

आशाताई बच्छाव

IMG-20220828-WA0022.jpg

खड्डे बुजवण्याची मागणी गोट्या खेळत करत राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन                                   रत्नागिरी,(सुनील धावडे)

कोकणातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याची मागणी करत राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम आज चांगलेच आक्रमक झाले होते. आज भरणेनाका येथील सर्व्हिस रोडवर त्यांनी गोट्या खेळत रस्त्याच्या बाजूला लोळत अनोखे आंदोलन केले. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवले जावेत अशी मागणी त्यांनी केली.

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आज शनिवारी दि २७ रोजी मुंबई- गोवा महामार्ग परिसरात भरणे येथील सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांमधे गोट्या खेळण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या माध्यमातून रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनाला माजी आमदार संजय कदम उपस्थित होते. त्यांनी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात लोळत घोषणाबाजी केली. ‘रस्त्यात खड्डा, खड्ड्यात रस्ता…’ अशा घोषणा यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या.

Previous articleगणपतीपुळे येथे बीच स्वच्छता मोहीम
Next articleराष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सकारात्मक भूमिकेमुळे आंदोलन स्थगित – मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.