आशाताई बच्छाव
कळवण तालुक्यातील मौजे रवळजी तालुका कळवण येथे बैल पोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा. कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
भारतदेश हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतक-याच्या शेतात सतत राबणारा बैल राजा पोळ्याच्या दिवशी बैलांना नदित नाल्यात घेऊन स्वच्छ पाण्याने आंघोळ घालतात. रंग रंघोटि,अंगावर झालर,नाथ -माठोकी,शिंगाणा फुगे बांधतात जशी आपण दिवाळी साजरी करतो तशी बैल पोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गावातील हनुमान मंदिरात जाऊन बैल राजाला प्रदक्षिणा घालून गावात मिरवणूक काढली जाते. मोठ्या संख्येने गावातील शेतकरी उपस्थित राहतात. मिरवणूक झाल्यावर पृतेक शेतकरी आपल्या बैलांना घरी घेऊन पुज्या पाणी करून पुरणपोळीचे नैवद्ध देतात.
यावेळी आपल्या गावातील मुंबई पोलिस हवालदार दिंगबर गांगुडॅ यांनी हनुमान मंदिराबाबत जो विषय मांडला तो विषय म्हणजे अतिशय महत्त्वाचा म्हणजे गावात हनुमान मंदिर नवीन बांधकाम व्हावे.
त्याच्याकडे सवॅ गावातील तरुण,जेष्ठ मंडळी यांनी ग्रामपंचायत माफॅत आमदार,खासदार यांना प्रस्ताव सादर करून निधी उपलब्ध करून घ्यावा .व गावातील पृतेक घरातून लोक वर्गणी गोळा करून सहकायॅ करावे. किती रुपये वगॅणी ठेवायची अशी गावात मिंटिग घेऊन निणॅय घ्यावा.






