Home नाशिक उमराणेत धर्मवीर आनंद दिघेंच्या पुण्यतिथीनिमित जाणता राजा मंडळाकडून शिवचरित्र भेट कार्यक्रम उत्साहात...

उमराणेत धर्मवीर आनंद दिघेंच्या पुण्यतिथीनिमित जाणता राजा मंडळाकडून शिवचरित्र भेट कार्यक्रम उत्साहात संपन्न

133

आशाताई बच्छाव

IMG-20220826-WA0073.jpg

(भिला आहेर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा :- धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने जाणता राजा मित्र मंडळा तर्फे जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा शिवचरित्र भेट देऊन सन्मानित  करण्यात आले.
उमराणे मावळ खो-यात जाणता राजा मित्र मंडळा तर्फे प्रत्येक क्षेत्रात समाजपयोगी उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे राबविले जात आहेत.धर्मवीर आनंद दिघे साहेब आपल्या समाज कार्याच्या जोरावर अवघ्या महाराष्ट्रावर ओळख निर्माण करून अधिराज्य गाजविणारे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त दि.२६ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी राजे चौकात त्यांच्या प्रतिमेचे पूजन कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल दत्तु देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.जवाहर नवोदय विद्यालयात नव्याने प्रविष्ट झालेल्या विद्यार्थी कु.वेदांत धनराज देवरे यांचा शिवचरित्र व स्वराज्याचे मानचिन्ह देऊन बाजार समितीचे संचालक प्रविण दामु देवरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामशिक्षण समितीचे सेक्रेटरी शिवाजी नामदेव देवरे होते.मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी आनंद दिघे साहेब यांच्या जीवन पटावरील माहिती विषद केली.माजी सभापती राजेंद्र देवरे, संदीप देवरे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रमुख पाहुणे म्हणुन मुरलीधर देवरे, केदा आण्णा देवरे, संजय देवरे, पंढरीनाथ सावंत, पुंडलिक गायकवाड, उत्तम देवरे, सचिन देवरे, गंगाधर देवरे, डी.व्ही.देवरे, रावसाहेब देवरे, अरुण देवरे, सुभान देवरे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमासाठी ग्रामस्थ व मंडळाचे कार्यकर्ते बहुसंखेने उपस्थित होते.

Previous articleसभामंडप व सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न
Next articleनांदगावला जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.