Home रत्नागिरी दिवंगत नगराध्यक्ष डॉ. केळकर यांच्या जयंतीप्रीत्यर्थ बालगृह संस्थेला ॲड. राजशेखर मलुष्टे यांनी...

दिवंगत नगराध्यक्ष डॉ. केळकर यांच्या जयंतीप्रीत्यर्थ बालगृह संस्थेला ॲड. राजशेखर मलुष्टे यांनी दिली देणगी

200

आशाताई बच्छाव

IMG-20220820-WA0018.jpg

दिवंगत नगराध्यक्ष डॉ. केळकर यांच्या जयंतीप्रीत्यर्थ बालगृह संस्थेला ॲड. राजशेखर मलुष्टे यांनी दिली देणगी

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : रत्नागिरीचे सर्वाधिक काळ (११ वर्ष ) व पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष, अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्थांच्या वाटचालीत मोलाचे योगदान देणारे थोर समाजसेवक डॉ. ज. शं. केळकर यांची १७ ऑगस्टला जयंती साजरी करण्यात आली. जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून बालगृह, निरीक्षणगृह संस्थेला प्रख्यात वकील ॲड. राजशेखर मलुष्टे यांनी देणगी दिली. ते या संस्थेचे नियमित देणगीदार आहेत. त्यांनी काल दुध फंडासाठी देणगी रक्कम रू. २१००/- संस्थेचे पदाधिकारी राजेंद्र पटवर्धन यांच्याकडे सुपुर्द केली. संस्थेतर्फे त्यांनी ॲड. मलुष्टे यांचे आभार मानले. तसेच जयंतीचे औचित्य साधून माळनाका येतील डॉ. ज. शं. केळकर मार्गफलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी ॲड. मलुष्टे, राजेंद्र पटवर्धन यांच्यासमवेत मनोज पाटणकर उपस्थित होते.

Previous articleआनंदीबाई प. अभ्यंकर बालकमंदिरात दहीहंडी
Next articleमालगुंड येथे दहीकाला उत्सव जल्लोषात गोपाळकृष्ण व कुणबी समाज गोविंदा पथकांनी फोडल्या दहीहंड्या!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.