Home रत्नागिरी संगमेश्वर लोवले येथे विराट विश्वकर्मा मय पांचाळ समाजातर्फे विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धा कार्यक्रम...

संगमेश्वर लोवले येथे विराट विश्वकर्मा मय पांचाळ समाजातर्फे विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धा कार्यक्रम उत्साहात

154

आशाताई बच्छाव

IMG-20220823-WA0084.jpg

संगमेश्वर लोवले येथे विराट विश्वकर्मा मय पांचाळ समाजातर्फे विद्यार्थ्यासाठी विविध स्पर्धा कार्यक्रम उत्साहात                                                          रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

रविवार २१ ऑगस्ट २०२२ रोजी श्री विराट विश्वकर्मा मय पांचाळ समाज मंडळ तालुका संगमेश्वर या नोंदणीकृत मंडळाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या. हा कार्यक्रम लोवले येथील शुभगंधा मंगल कार्यालय मयूर बाग येथे पार पडला.

या कार्यक्रमाप्रसंगी पांचाळ- सुतार समाज संघ रत्नागिरी कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष श्री वासुदेव मेस्त्री, तालुक्यातील विद्यार्थी वर्ग, समाज बांधव, प्रतिष्ठित मान्यवर आजी-माजी कार्यकारणी आणि सल्लागार उपस्थित होते. समाजबांधवांच्या मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कलेला दाद मिळावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात तालुक्यातील १५४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ असे क्रमांक देण्यात आले. यशस्वी स्पर्धकांना भेट वस्तू व प्रशस्तीपत्र तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

चित्रकला स्पर्धेचे परीक्षण कु.मृण्मयी पांचाळ आणि वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण श्री. संदेश झेपले सर,श्री. मोहिते, श्री. होडे आणि वझे गुरुजी यांनी केले. हा स्तुत्य उपक्रम श्री. कृष्णा मेस्त्री गुरुजी यांच्या संकल्पनेतून, तसेच मंडळाचे तालुकाध्यक्ष श्री. राजेश मोगरोणकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, कार्यकारिणीतील सर्व सदस्य यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव श्री. गणेश सुतार यांनी केले .या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous articleखेडमधील संगलट गावातील तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी मुजीबभाई नाडकर यांची निवड
Next article“मायक्रो लॅब”तर्फे नाचणे येथे महिलांसाठी मोफत हिमोग्लोबीन तपासणी संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.