Home बुलढाणा अवैध रेती वाहतुकीचे वाहन पकडले

अवैध रेती वाहतुकीचे वाहन पकडले

38
0

आशाताई बच्छाव

IMG-20220823-WA0100.jpg

अवैध रेती वाहतुकीचे वाहन पकडले
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बूलढाणा
संग्रामपूर तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर कार्यवाहीला सुरुवात. तहसीलदार वरणगावकर यांच्या मार्गदर्शनात प्रभारी नायब तहसीलदार हरिभाऊ उकर्डे यांच्या पथकाने आज दिनांक 23/08/ 2022 रोजी सकाळी 10:45 वाजताच्या दरम्यान वरवट बकाल गाव मध्ये अवैद्य रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले असता वाहन चालकाला रॉयल्टी विचारली परंतु रॉयल्टी आढळून आली नसुन सदरचे MH 30 BD 0601क्रमांकाचे (407)वाहनाचा पंचनामा करून वाहन पोलीस स्टेशन तामगाव येथे लावण्यात आले व पुढील दंडात्मक कारवाई करिता तहसीलदार यांच्या कडे प्रकरण दाखल करण्यात आले सदर कारवाई ही प्रभारी नायब तहसीलदार हरिभाऊ उकर्डे मंडळ ,अधिकारी आर आर. बोराखडे ,तलाठी एम एस कूसळकर .अविनाश खरे यांच्या पथकाने केली .अवैद्य रेती चोरी मुळे पर्यावरणाची हानी व शासनाचे राजरोसपणे होणारे नुकसान थांबवण्यासाठी अखेर प्रभारी नायब तहसीलदार हरिभाऊ उकर्डे यांचे मंडळ मैदानात उतरून रेती माफियांवर कार्यवाहीला सुरुवात करावी लागली.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता कार्यकारणी संदर्भात बैठक
Next articleमुखेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शिवाजी कोनापूरे तर सचिवपदी अनिल कांबळे यांची निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here