Home नाशिक मनमाड शहरात निषेध मोर्चा व जेल भरो आ‌ंदोलन

मनमाड शहरात निषेध मोर्चा व जेल भरो आ‌ंदोलन

136

आशाताई बच्छाव

IMG-20220822-WA0023.jpg

मनमाड शहरात निषेध मोर्चा व जेल भरो आ‌ंदोलन…
नांदगांव प्रतिनिधी अनिल धामणे
2002 साली झालेल्या बिलकीस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींना मुक्त करण्यात आलं आहे. व माठातील पाणी पिल्याने मारहाणीत दलित विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असल्याने तसेच भंडारा गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचे
राजस्थान, गुजरात ,भंडारा घटनेचे पडसाद मनमाड शहरात उमटले असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. अशातच मनमाड मधील भीम सैनिक व मुस्लिम संघटनेने शहरातून रॅली काढत हातात काळे झेंडे घेऊन जाहीर निषेध करत,जेल भरो आंदोलन करण्यात आले,बलात्कार करणाऱ्यांना माफी देणाऱ्या गुजरात सरकारचा धिक्कार असो,बलात्कारी खुनी गुजरात सरकारचा निषेध असो,दलित विद्यार्थ्याचा बळी घेणाऱ्या शिक्षकाला फाशी द्या,मोदी सरकारचा निषेध असो,बेटी पढाव बेटी बचाव या ढोंगी घोषणा देणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो,नारी सन्मानाची फक्त घोषणा करणाऱ्या व प्रत्यक्षात नारीची बेइज्जत करणाऱ्या मोदी सरकारचा जाहीर निषेध असो अश्या घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गाने हे आंदोलन करण्यात आले,यावेळी शहरातील सामाजिक संघटना,सर्व धर्मिय नागरिक,राजकिय पक्ष्याचे पदाधिकारी भीम सैनिक,मुस्लिम संघटना व महिला वर्ग मोठया संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते.

Previous articleभोकर तालुक्यात भोंदू बाबाला अटक
Next articleसमर्थांचे देव गेलेत चोरीला!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.