Home रत्नागिरी प्रत्येक तरूण आत्मनिर्भर झाला तर भारत आत्मनिर्भर होईल- कौस्तुभ फाटक

प्रत्येक तरूण आत्मनिर्भर झाला तर भारत आत्मनिर्भर होईल- कौस्तुभ फाटक

166

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0030.jpg

प्रत्येक तरूण आत्मनिर्भर झाला तर भारत आत्मनिर्भर होईल- कौस्तुभ फाटक

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) – भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कौस्तुभ फाटक यांचे ज्यांनी लिहिली स्वातंत्र्याची गाथा, त्यांच्या चरणी ठेवू कर्तव्यमाथा या विषयावर प्रवचन झाले.

कौस्तुभ फाटक यांनी आपल्या प्रवचनातून आजच्या तरूण पिढीला स्वातंत्र्य मिळवायचे नाहीये तर ते टिकवायचे आहे, प्रत्येक तरूण आत्मनिर्भर झाला तर भारत आत्मनिर्भर होईल तसेच विविध क्रांतिकारकांचे देशकार्य उलगडून सांगितले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना क्रांतिकारकांनी केलेल्या बलिदानाची आठवण ठेवली पाहिजे.असेही कौस्तुभ फाटक यांनी सांगितले.

कार्यक्रमाला संस्थेचे कार्यकारणी सदस्य विनायक हातखंबकर, प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ.वसुंधरा जाधव,मराठी विभागप्रमुख सौ.अनन्या धुंदूर, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleअग्निवीर तरुण रात्रभर रस्त्यावरच थांबले?
Next articleसरकारवरचा माझा विश्वासच उडाला ! सामूहीक बलात्कार प्रकरणी बिल्कीस बानोनं मौन सोडलं…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.