आशाताई बच्छाव
मुक्रमाबाद येथे राष्ट्रीय गायन कार्यक्रम संपन्न
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे ( युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुक्रमाबाद येथील विविध शाळा-महाविद्यालयात राष्टीय गायन(सामूहिक राष्टगीत)कार्यक्रम दि.१७ ऑगस्ट रोजी अकरा वाजता घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूने म्हणून मुक्रमाबाद नगरीचे सरपंच अंजिताताई बालाजी बोधने,प्राचार्य श्री मुकुंदराज जाधव, मुख्याध्यापक श्री कापसे अभय, श्री चंद्रकांत पाटील,प्रा.बबन जाधव,प्रा.ढोकाडे आर.एस.,डाॅ. सकनूरे सूर्यकांत, डाॅ. रमाकांत बिडवे,श्री संतोष पाटील, श्री श्रीधर मंडगे हे होते. या कार्यक्रमात छ.संभाजी प्राथमिक शाळा, छ.शिवाजी ज्यू.काॅलेज आणि स्वामी विवेकानंद महा.,राजेश्वरराव पाटील अध्यापक महाविद्यालय यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमात छ.संभाजी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी-कर्मचारी,छ.शिवाजी ज्यू.काॅलेजचे विद्यार्थी,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.