Home नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी दिली तंबाखू मुक्तीची शपथ

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली तंबाखू मुक्तीची शपथ

160

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0124.jpg

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली तंबाखू मुक्तीची शपथ
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका), दि. 15 :- भारत सरकारचा तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा व महाराष्ट्र शासनाच्या याबाबत शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी उपस्थितांना तंबाखु मुक्तीची शपथ दिली. नियोजन भवन येथील सभागृहात सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यक्रमात ही शपथ घेतली.

शपथ

तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच बिडी, सिगारेट, ई-हुक्का, ई-सिगारेट व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे होणारे आजार यांच्या दुष्परीणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त रहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा व थुंकदानीचा वापर करावा यासाठी मी प्रयत्न करेन. भारत सरकारचा तंबाखू नियंत्रण कायदा 2003 तसेच महाराष्ट्र शासनाचा तंबाखूजन्य पदार्थ यांचे सेवन, थुंकण्यास व धुम्रपानास प्रतिबंध या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. माझ्या अधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त व ई-सिगारेट मुक्त करेन. मी, माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन.

Previous articleतृतीयपंथीय सेजलकडे नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र सन्मानाने हस्तांतरीत
Next articleकळवण प्रशासकीय कार्यालयात मध्ये 75 वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.