आशाताई बच्छाव
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा असे शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन वाशिम,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
मागील महिन्या भरापासून राज्यात मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे मंगरूळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही नदीकाठची व नाल्या काठची शेती खरडून गेली तर काही शेतातील पीक वाहून गेले. अशा बऱ्याच अडचणीमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला असून, शेतकऱ्यांना राज्य शासनाने तात्काळ मदत करावी. याकरिता मंगरूळपीर तालुका शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. मागील चार-पाच दिवसापासून मंगरूळपीर तालुक्यात मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांची शेती खरडून वाहून गेली आहे. तर काही शेतकऱ्यांची पीक संपूर्ण नष्ट झालेले आहे. तसेच काही शेतकऱ्यांचे पीक पाण्यामुळे पिवळी पडलेली आहे. मागील दोन महिन्यापासून लहान मुलासारखं तळहातावर सांभाळलेल्या या पिकाची आज ही अवस्था पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू वाहायला सुरुवात झालेली आहे. या पावसासारखा आता शेतकऱ्यांचाही सहयमांचा बांध फुटलेला दिसून येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या सर्व गोष्टीचा विचार करून तात्काळ शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी शासन दरबारी शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच तालुक्यातील मोझरी येथे 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसामुळे मोझरी गावा नजीकच्या पुला भवताल खोदलेल्या अनधिकृत नाल्यामुळे पुलाचे पाणी मोझरी गावात घुसले. तसेच शेतकऱ्यांच्या पिकात पुरांचे पाणी घुसल्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. या पुलाचे उभारणी करताना काही चुका असल्याचे तेही संबंधित विभागाने तात्काळ चौकशी करून या पुलांचे मोजमाप करून योग्य ते नाल्यांची उभारणी करावी व शेतकऱ्यांच्या पिकांचे रक्षण करावे अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रामदास पाटील सुर्वे, बबनराव सावके, सचिन डोफेकर,पं.स.सदस्य बंडू वैद्य,पं.स. उपसभापती विलास लांभाडे, प्रकाश अपूर्वा, विनोद वैद्य, बाळकृष्ण रोकडे, सचिन राऊत, गजानन सुर्वे, गोपाल सुर्वे, सुभाष राऊत, विजय भुरे, विजय शेळके, सिद्दीक शहा, गणेश मुळे, गजानन राऊत, सचिन सोनवणे, यासह बहुसंख्य शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.






