Home रत्नागिरी मापारी मोहल्ला उर्दू शाळेत विविध उपक्रमांद्वारे “हर घर तिरंगा” जनजागृती मोहिम

मापारी मोहल्ला उर्दू शाळेत विविध उपक्रमांद्वारे “हर घर तिरंगा” जनजागृती मोहिम

110

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0018.jpg

मापारी मोहल्ला उर्दू शाळेत विविध उपक्रमांद्वारे “हर घर तिरंगा” जनजागृती मोहिम                                रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

चिपळूण तालुक्यातील मापारी मोहल्ला उर्दू शाळेत ग्रामस्थ, पालक, समाजसेवक, शिक्षणप्रेमी व्यक्ती तसेच विद्यार्थी आणि शिक्षक या सर्वांच्या सहकार्याने “हर घर तिरंगा” जनजागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून यशस्वी करण्यात आला.

शाळेत प्रभातफेरी, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, देशभक्तिपर गीतगायन स्पर्धा आदी उपक्रम राबविण्यात आले. याला ग्रामस्थ तसेच पालकांचे उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रातील समाजसेवक खालिद भाई उंडरे, अब्दुल गनी कोकाटे , महमूद मापारी, अब्दुल रहमान गोठे, शाहिद उंडरे, माजी शिक्षक मुश्ताक अष्टीकर, शा.व्य.स.अध्यक्ष परवीन शाह, यास्मीन सिद्दिकी, अस्मीना मुल्लाजी, बुशरा बागवान तसेच अनेक पालकांचे सहकार्य लाभले. खालिद उंडरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या मित्रमंडळीकडून दप्तरे, कंपास बाॅक्स पाट्या पेन्सिल तसेच आवश्यक शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी उत्तम मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रेरित करणे आणि समाजाकडून विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळविण्यासाठी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका रेहाना वलेले यांनी खूप मेहनत घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशस्वी सुत्रसंचालन समीना शेख यांनी केले. उपस्थितांचे स्वागत एजाज इब्जी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात मदतीचा हात देणाऱ्या सर्व मान्यवरांचे रेहाना वलेले मॅडम यांनी आभार मानले.

Previous articleरक्षाबंधनासाठी जात असलेल्यांची बोट बुडाली, ३५ जण बेपत्ता
Next articleरत्नागिरी जिल्ह्याचे कुणबी सामाजचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते सहदेव बेटकर यांनी घेतली एकनाथजी शिंदेंची भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.