Home रत्नागिरी देव, घैसास, कीर महाविद्यालयात दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा

देव, घैसास, कीर महाविद्यालयात दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा

107

आशाताई बच्छाव

IMG-20220809-WA0021.jpg

देव, घैसास, कीर महाविद्यालयात दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा                                  रत्नागिरी,( सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

रत्नागिरीतील भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांसाठी विविध विषयांवर दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.

दोन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी प्रथम सत्रात शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रमा भोसले यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर मार्गदर्शन केले व द्वितीय सत्रात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे भूगोल विषयाचे प्राध्यापक व आयक्यूएसी समन्वयक डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी दर्जेदार शिक्षण आणि व्यावसायिक विकासासाठी संशोधन या विषयावर मार्गदर्शन केले.

दुसऱ्या दिवसाच्या प्रथम सत्रात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांनी महाविद्यालय व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले, द्वितीय सत्रात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे ग्रंथपाल किरण धांडोरे यांनी नॅकच्या दृष्टीकोनातून ग्रंथालय विकास या विषयावर मार्गदर्शन केले. तृतीत सत्रात लांजा महाविद्यालयाचे प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ.राहुल मराठे यांनी वर्ग व्यवस्थापनातील संप्रेषण कौशल्ये या विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी डॉ.राहुल मराठे यांच्या हस्ते सर्व प्राध्यापकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या व आयक्यूएसी समन्वयक सौ. वसुंधरा जाधव, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेचे नियोजन आयक्यूएसी विभाग व शिक्षक प्रशिक्षण समिती यांनी केले होते.

Previous articleमुसळधार पावसाने फुणगूस खाडीपट्टी भागात पुर परिस्थिती; भातशेतीचे नुकसान
Next articleजि.प. पू.प्राथ. शाळा चाफे नं 1 शाळेतील मुलांनी बनवल्या तिरंगी राख्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.