Home रत्नागिरी तेजस ठाकरे पाली, सरडे शोधता शोधता राजकारणात आले : नितेश राणे ठाकरेंनी...

तेजस ठाकरे पाली, सरडे शोधता शोधता राजकारणात आले : नितेश राणे ठाकरेंनी सर्व महत्त्वाची पदं कुटुंबात ठेवली, त्यांना बाहेरचं कोणीच चालत नाही

204

आशाताई बच्छाव

IMG-20220808-WA0011.jpg

तेजस ठाकरे पाली, सरडे शोधता शोधता राजकारणात आले : नितेश राणे ठाकरेंनी सर्व महत्त्वाची पदं कुटुंबात ठेवली, त्यांना बाहेरचं कोणीच चालत नाही       रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

तेजस ठाकरे पाली, सरडे शोधता शोधता राजकारणात आले, त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा म्हणून फुकटात मंत्रीपद मिळेल, पण त्यांचे तेवढे कर्तृत्व नाही, अशा शब्दात भाजप नेते निलेश राणे यांनी जळजळीत टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांचे धाकटा मुलगा तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करण्याची राजकीय गोटात चर्चा सुरु आहे. यात तेजस ठाकरेंच्या वाढदिवशीच त्यांच्या राजकीय प्रवेशाची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्य़ेला निलेश राणे यांनी जहरी टीका केली आहे.

तेजस ठाकरे पाली, सरडे शोधता शोधता राजकारणात आले. ठाकरेंनी सर्व महत्त्वाची पदं कुटुंबात ठेवली, त्यांनी बाहेरचं कोण चालत नाही, बाकीच्यांनी फक्त खुर्चा, टेबल उचलण्याचे काम करायचे. व्यक्ती किती शेंबडा असू दे आडनाव ठाकरे असेल तर तो मुख्य पदावर दिसेल, असा टोला निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

सगळी पद ठाकरे स्वत:कडे ठेवणार, तेव्हा कार्यकर्त्यांनी विचार करा त्यांना किती साथ द्यायची. उद्धव ठाकरेंपासून ते तेजस ठाकरेंपर्यंत जे काही मिळाले ते केवळ ठाकरे आडनावामुळे, बाकी कर्तृत्व शून्य अशी टीकाही निलेश राणेंनी केली.

Previous articleरघुवीर घाटात कोसळलेली दरड अखेर बांधकाम विभागाने हटवली
Next article5 तासाच्या प्रयत्नानंतर संगमेश्वर कासे पुर्ये येथील दरड बाजूला करण्यात ग्रामस्थांना यश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.