Home रत्नागिरी रघुवीर घाटात कोसळलेली दरड अखेर बांधकाम विभागाने हटवली

रघुवीर घाटात कोसळलेली दरड अखेर बांधकाम विभागाने हटवली

155

आशाताई बच्छाव

IMG-20220808-WA0012.jpg

रघुवीर घाटात कोसळलेली दरड अखेर बांधकाम विभागाने हटवली                                                 रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

महामार्गावर दरडी कोसळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. काल रविवार 5 ऑगस्ट रोजी रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात दरड कोसळली होती. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे कांदाटी खोऱ्यातील सुमारे 21 गावांचा खेड तालुक्याशी संपर्क तुटला होता.

आतापर्यंत या रघुवीर घाटात 3 वेळा दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे बाजारहाटसाठी खेडकडे येणाऱ्या सातारा जिल्ह्यातील 21 गावांचा संपर्क तुटतो. काही दिवसांपूर्वी घाटात कोसळलेली दरड बाजूला करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला तब्बल 36 तासांचा अवधी लागला होता. आता पुन्हा एकदा घाटात दरड कोसळली आणि हा घाट वाहतुकीसाठी बंद झाला. घाट बंद झाल्याने या खोऱ्यातील सुमारे २१ गावांचा संपर्क पुन्हा एकदा तुटला. दरड कोसळल्याची बातमी मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारांच्या मदतीने दरड काढण्याचे काम सुरु केले आहे. मात्र मुसळधार पाऊस असल्याने दरड बाजूला करण्यात अडथळे येत होते. उशिरा ही दरड बाजूला करण्यात आली.

Previous articleचिकटगाव येथे न्यू हायस्कूलच्या वतीने हर घर तिरंगा
Next articleतेजस ठाकरे पाली, सरडे शोधता शोधता राजकारणात आले : नितेश राणे ठाकरेंनी सर्व महत्त्वाची पदं कुटुंबात ठेवली, त्यांना बाहेरचं कोणीच चालत नाही
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.