Home नांदेड मुखेड तालुक्यातील सांगवी भादेव येथे ढगफुटी सदृश्य पाऊस, शेती पिकांचे मोठे नुकसान.

मुखेड तालुक्यातील सांगवी भादेव येथे ढगफुटी सदृश्य पाऊस, शेती पिकांचे मोठे नुकसान.

154

आशाताई बच्छाव

Screenshot_20220806-060719_Gallery.jpg

मुखेड तालुक्यातील सांगवी भादेव येथे ढगफुटी सदृश्य पाऊस, शेती पिकांचे मोठे नुकसान.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील सांगवी भादेव येथे दुपारी ३ ते ४ वाजेच्या सुमारास पावसाने रौद्ररूप धारण केल्याने मुसळधार पाऊस होऊन नदी नाल्यांना पूर आल्याने सांगवी भादेव येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. प्रशासनाकडून तात्काळ पंचनामे करण्यात यावे.अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. गेल्या अनेक दिवसापासून सांगवी भादेव येथील असणाऱ्या रस्त्यावर मोठ्या पूलाची मागणी नागरिकांनी गेल्या तीन वर्षापासून करुन सुद्धा अध्यापही पूलाची उंची वाढवण्यात आलेली नाही. संबंधित यंत्रणेला अद्यापही जाग आली नाही. एखाद्याचा बळी गेल्यावरच शासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल बालाजी पाटील सांगवीकर यांनी केला आहे

Previous articleदेशभरात काँग्रेसचे आंदोलन
Next articleपरमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालया अंतर्गत आज शहरातील राजशेखर मंगल कार्यालय येथे नेतृत्व गुण विकास शिबिर या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.