Home Breaking News देशभरात काँग्रेसचे आंदोलन

देशभरात काँग्रेसचे आंदोलन

147

आशाताई बच्छाव

Screenshot_20220805-210110_Google.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: देशभरामध्ये काँग्रेसचे आंदोलन; राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये काँग्रेसने आंदोलन केले जंतर-मंतर वरती आंदोलनाची परवानगी मागितली असता त्यांना त्या ठिकाणी देण्यात आली. इतर ठिकाणी दिल्ली पोलिसांनी १४४ कलम लागू केला होता. त्या अंतर्गत आंदोलनाचा भडका उडाल्यामुळे दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी प्रियंका गांधी नाना पटले इत्यादींना अटक केली. राहुल गांधी म्हणाले आम्हाला कितीही पकडा आम्ही मोदींना घाबरत नाही. महागाई भरमसाठ वाढली, बेरोजगारी खूप प्रमाणामध्ये वाढली, गॅसचे दरही खूप उंचीवर गेले याबाबत या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय असे त्यांनी सांगितले. देशांमध्ये जो सत्य बोलतो त्याच्या विरोधात ईडी कारवाई होते असे आरोप त्यांनी मोदी सरकार वरती केले. देशभरामध्ये नागपूर अमरावती नाशिक मुंबई पुणे इत्यादी ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते यांनी हे आंदोलन केले व त्यांना तेथील पोलिसांनी धर पकड करण्याचे काम केले.

Previous articleशिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांचा मोठा गौप्यस्फोट
Next articleमुखेड तालुक्यातील सांगवी भादेव येथे ढगफुटी सदृश्य पाऊस, शेती पिकांचे मोठे नुकसान.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.