Home पुणे कुरकुंभ येथे भीषण अपघातात दोन सख्ख्या बहिणीत एकीचा मृत्यू तर दुसरी जखमी

कुरकुंभ येथे भीषण अपघातात दोन सख्ख्या बहिणीत एकीचा मृत्यू तर दुसरी जखमी

133

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0010.jpg

युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी श्री प्रशांत नागणे                                                      कुरकुंभ येथील झालेल्या दुचाकी व कंटेनरच्या अपघातामध्ये महिला ठार तर सख्खी बहीण जखमी पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंब हद्दीमध्ये दुचाकीवर निघालेल्या दोन सख्ख्या बहिणींना टँकरने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याचे घटना काल गुरुवार(04) घडली आहे सारिका गोकुळ खोडवे वय 30( रा मिरजगाव ता कर्जत जी अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे तर प्रियंका नवनाथ काळे असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे याप्रकरणी पोलिसांमध्ये संजय ज्ञानदेव गब यांनी फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी कंटेनर चालक सिद्धाप्पा लक्ष्मण देवकाते याला ताब्यात घेतले आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे प्रियंका व सारिका या पुणे-सोलापूर महामार्गावरून निघाल्या होत्या कुरकुंभ एम आय डी सी येथील गिरमे वस्ती परिसरात आले असता त्यांना सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या जोरदार कंटेनरने धडक दिली या धडकेत सारिका खोडवे यांना मोठ्या प्रमाणात मार लागला त्यातच त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या बहिणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत कंटेनर चालकाच्या निष्काळजीपणाने वाहन चालून महिलेचा मृत्यू कारणीभूत ठरल्याने दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे

Previous articleहि तर जनसेवेच्या व्रतातून समाजाचे ऋण फेडण्याची मिळालेली संधी – आ. वडेट्टीवार
Next articleअमानवी कृत्याने घेतला ‘कृष्णा’चा बळी !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.