Home गडचिरोली जनविरोधी धोरणांविरोधात लाल बावट्याच्या नेतृत्वात जनतेने एकत्र यावे : काॅ. डाॅ.महेश कोपूलवार

जनविरोधी धोरणांविरोधात लाल बावट्याच्या नेतृत्वात जनतेने एकत्र यावे : काॅ. डाॅ.महेश कोपूलवार

108

आशाताई बच्छाव

IMG-20220804-WA0018.jpg

जनविरोधी धोरणांविरोधात लाल बावट्याच्या नेतृत्वात जनतेने एकत्र यावे : काॅ. डाॅ.महेश कोपूलवार

शेकापचा अमृत महोत्सवी वर्धापनदिन उत्साहात साजरा

गडचिरोली ( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने भांडवलशाहीच्या फायद्याचे धोरण अंमलात आणले असून सामान्य जनतेला जगणे कठीण केले आहे. त्यामुळे या सरकारविरोधात जनतेला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नसून भांडवलशाही विरोधात जगभरात आवाज बुलंद करणाऱ्या लाल बावट्याच्या नेतृत्वात जनतेने एकत्र यावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी नेते काॅ.डाॅ. महेश कोपूलवार यांनी केले.

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, बहुजन रिपब्लिकन सोशालिष्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोडे, जिल्हा प्रभारी राज बन्सोड, शेकाप महिला नेत्या जयश्री वेळदा, डॉ.गुरुदास सेमस्कर, तुकाराम गेडाम,चंद्रकांत भोयर, रमेश चौखुंडे, बाजीराव आत्राम, गुरवळा सरपंच दर्शना भोपये, पुलखल सरपंच सावित्री गेडाम, कोठी सरपंच भाग्यश्री लेखामी, ग्रा.प.सदस्य कविता ठाकरे, विलास अडेंगवार, देवेंद्र भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.

जागतिक राजकीय वारे आता बदलायला लागले असून वैचारिक निष्ठा आणि जनहितासाठी संघर्ष करणाऱ्या डाव्या पक्षांना पुन्हा मोठे जनसमर्थन मिळायला लागले असून नितिमत्ता सोडलेल्या धंदेवाईक राजकारणाचा तरुणांना विट आला असून राज्यात आणि जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षासह डावे आणि आंबेडकरवादी पक्ष नव्या दमाने उभारी घेतील असा आशावाद शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केला.

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे प्रभारी राज बन्सोड, जयश्री वेळदा, डॉ.गुरुदास सेमस्कर, तुकाराम गेडाम यांनीही आपल्या मार्गदर्शनात केंद्रातील मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात आणि एकनाथ शिंदेंच्या भूमिकेविरोधात कडाडून टीका केली.

कार्यक्रमाचे संचालन युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर तर आभार देवेंद्र चिमनकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक किरंगे, रमेश गेडाम, देवराव शेंडे, भगवान मानकर, विनोद मेश्राम, राजकुमार प्रधान, विजया मेश्राम, पुष्पा चापले, कालिदास जराते, अनिकेत गेडाम, वैभव मानकर यांनी परिश्रम घेतले.

Previous articleजगाच्या पोशिंद्याला वाचविण्यासाठी धावले काँग्रेस कमिटी सावली———-
Next articleमा.खासदार संजय राऊत साहेब यांच्या अटकेविरोधात गडचिरोलीतील शिवसैनिकांचा केंद्र शासना विरोधात एल्गार…. !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.