Home गडचिरोली मा.खासदार संजय राऊत साहेब यांच्या अटकेविरोधात गडचिरोलीतील शिवसैनिकांचा केंद्र शासना विरोधात एल्गार…....

मा.खासदार संजय राऊत साहेब यांच्या अटकेविरोधात गडचिरोलीतील शिवसैनिकांचा केंद्र शासना विरोधात एल्गार…. !

28
0

आशाताई बच्छाव

IMG-20220804-WA0023.jpg

मा.खासदार संजय राऊत साहेब यांच्या अटकेविरोधात गडचिरोलीतील शिवसैनिकांचा केंद्र शासना विरोधात एल्गार…. !

मा.खासदार संजय राऊत साहेब साहेब यांच्या अटकेचे पड़साद गडचिरोलीत शिवसैनिक आक्रमक

शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात आंदोलन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
केंद्र सरकारने केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून सुडबुुध्दीने कारवाई करीत आहे. शिवसेनेचे तडफदार नेते तथा खासदार मा. संजय राऊत साहेब यांच्यावर सुध्दा इडीने सुडबुध्दीने कारवाई करीत अटक केली आणि शिवसेनेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप करीत या कारवाई विरोधात गडचिरोली येथील शिवसैनिक संतप्त होऊन शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात आज ३ ऑगस्ट रोजी अरविंद भाऊ कात्रटवार यांच्या जनसंपर्क कार्यलया पासून इंदिरा गांधी चौका पर्यंत निषेद रैली काढून स्थानिक इंदिरा गांधी चौकात आंदोलन करून मा.खासदार संजय राऊत साहेब यांच्या विरोधात करण्यात आलेल्या करवाईचा निषेध करण्यात आला.शिवसैनिक स्थानिक इंदिरा गांधी चौकात गोळा झाल्यानंतर निदर्शने करण्यात आली. जय भवानी जय शिवाजी, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना खासदार मा.संजय राऊत साहेब यांचा विजय असो,संजय राऊत साहेब संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, जिंदाबाद जिंदाबाद मा.संजय राऊत साहेब जिंदाबाद,अशा घोषणांनी शिवसैनिकांनी इंदिरा गांधी चौक परिसर दणाणून सोडला. शिवसेनेचे झुंजार नेते खा.मा.संजय राऊत साहेब यांच्यावर इडी कडून करण्यात आलेल्या कारवाईचा शिवसैनिकांनी निषेध करीत केंद्र सरकारवर आसूड ओढले.केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्षातील नेत्यांवर सुडभावनेने कारवाई करीत आहे. मा.खासदार संजय राऊत साहेब यांच्यावर कारवाई करून शिवसेनेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेना ही हिंदू हदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर शिवसैनिकांची सेना आहे. राजकीय आकसापोटी शिवसेनेचा आवाज दडपण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. परंतू शिवसैनिक कधीही कोणापुढे झुकणार नाही. केंद्र सरकारच्या हुकुुमशाही कारभारा विरोधात शिवसेना सडेतोड उत्तर देईल. इडीला हाताशी धरून शिवसैनिकांचा अंत कोणाीही पाहून नये , असा इशाराही शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार यांच्या वतीने देण्यात आला.देशात अद्यापही लोकशाही जिवंत असून न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. मा.खासदार संजय राऊत साहेब यांच्या विरोधात करण्यात आलेली कारवाई निरर्थक असून केवळ राजकीय सुडबुध्दीने करण्यात आली आहे, हे लवकरच स्पष्ट होईल, यापुढे कुणी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही मा.बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक शांत बसणार नाही, असा इशाराही शिवसेना सहसपंर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार व शिवसैनिकांनी या आंदोलनाच्या माध्यमातून दिला.मा.खासदार संजय राऊत साहेब यांच्या अटकेविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात शिवसेना सहसंपर्कप्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार,महिला जिल्हा संघटिका छायाताई कुंभारे,जिल्हा संघटक विलास ठोबरे,उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे,सुनंदाताई आतला,नवनाथ ऊके,विलास थोंबरे,संदीप अलबनकर,प्रशांत ठाकुर,संदीप भुरसे,मुकेश गुरनुले,सूरज उइके,अमित बानबले,आनंदराव चुधरी,दिलीप चनेकर,ईश्वर लाजुरकर, रूपेश हतबले, स्वप्निल मोडक़र, तुषार बोरकर,अष्पक सय्यद,रूपेश सिडाम, तुषार मशाखेत्री,मोहन आड़े,रविन्द्र जेंगथे, प्रमोद कोकोडे,महेश भोयर, विकास उन्दिरवाडे, जयकुमार खेडेकर,कुशन ठवले,क्षत्रपति भैसरे,कवडू धंधरे,विट्ठल मंदिकर,अमोल मड़ावी,कृष्णा बावने,दीपक सेलोट, राहुल सोरते,अरुण बारापात्रे,बंटी वलादे,राजू जवाड़े, घनशाम उइके,प्रशांत शेडमाके,मधुकर बावने,सूरज टेकाम,सचिन सेलोट, किशोर देशमुख हरबाजी दजगये,कैलास भुरसे,ईश्वर लाजुरकर,त्रयम्बक फुलझेले,खुशल चुधरी,संदीप टेम्भूर्ण, वासुदेव दोम्बले,नानजी रंडीये,पूंजीराम चुधरी,भगवान चनेकर,राहुल खेवले, तानाबा दजगये,अभिषेख कुकडे,अमर मड़ावी,अभाजी लोनबले,यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.

Previous articleजनविरोधी धोरणांविरोधात लाल बावट्याच्या नेतृत्वात जनतेने एकत्र यावे : काॅ. डाॅ.महेश कोपूलवार
Next articleतिरखुरा येथे वाचनालय व अभ्यासकेंद्रा चे भूमिपूजन सपंन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here