आशाताई बच्छाव
अपुऱ्या वर्ग खोल्यामुळे शिक्षकांना दोन सत्रात चालावी लागते शाळा..
युवा स्वाभिमानी पार्टी बुलढाणा ची टूनकी येथे जिल्हापरिषद शाळेवर धडक
शेकडो शाळकरी मुलांकरिता मूठभर शिक्षकांची तारेची कसरत..
युवा मराठा न्युज वेब पोर्टल
प्रतिनिधी -रवि शिरस्कार,संग्रामपूर
संग्रामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळा टुनकी येथील मुलांच्या पटसंख्या नुसार शिक्षक उपलब्ध नसुन बरीच पदे रिक्त आहेत .
तसेच मुलांच्या पट संख्येप्रमाणे शिकवणी करता खोल्या सुद्धा उपलब्ध नाहीत.यामुळे मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आहे अशी तक्रार टूनकी येथील पालक वर्गाकडुन होत आहे.
दिनांक २६ जुलै रोजी युवा स्वाभिमानी पार्टी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष राजपाल वानखडे, संग्रामपूर अध्यक्ष प्रभुदास पारस्कर,सहसचिव निखिल चौधरी तसेच संग्रामपूर तालुक्यातील पार्टीचे पदाधिकारी यांनी गावातील काही पालक वर्ग यांच्या सह शाळेला भेट दिली.
या शाळेत मुलांची एकूण ४०२ पट संख्या असुन एकूण १ते ७ वर्ग आहेत त्यामध्ये एकुण १३ तुकड्या आहेत.
मागील वर्षी शाळेमध्ये १४ शिक्षक उपलब्ध होते. त्यानंतर बदली मुळे, सेवा निवृत्ती यामुळे ५ शिक्षक कमी झाले आहेत.
शाळे मधील काही खोल्या शिकस्त झाल्यामुळे मागील २ वर्षांपासून कुलूपबंद अवस्थेत त्या पडुन आहेत. या शाळेत मुख्याध्यापक पद रिक्त असुन १ पदवीधर,२ सहायक अशी ४ पदे रिक्त आहेत.
पट संख्येच्या आधारावर शाळेमध्ये खोल्या मुबलक प्रमाणात नसल्याने नाईलाजाने शिक्षकांना शाळेचा नियमित वेळ १० ते५ हा बदलवून शाळा २ सत्रा मध्ये घ्यावी लागत आहे.
एक शिक्षक दोन तुकड्यां सांभाळत मुलांना शिक्षणाचे धडे देत आहे.
हे काम शिक्षका करिता तारेवरची कसरत असली तरी विद्यार्थ्यांची भवितव्य सुद्धा तेवढेच धोक्यात आहे एवढे मात्र निश्चित.
रिक्त पदांची,खोलीची अडचन या बाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळोवेळी पाठवण्यात येतो तरी पण वरिष्ठ अधिकारी या गंभीर विषयाकडे लक्ष का देत नाही याबाबत पालक वर्ग चिंतेत आहे.
शाळेतील रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरून शिकस्त खोल्यांचे नवीनीकरन करावे
व मुलांच्या शैक्षणिक भवितव्याला नव संजीवनी देण्याचे काम करावे अशी मागणी गावातील सर्व पालक वर्गांकडून होत आहे.






