Home गडचिरोली माननीय.सुधीर भाऊ सारखा नेता लाभला हे आमचे भाग्य. आजाद नगर वासी.

माननीय.सुधीर भाऊ सारखा नेता लाभला हे आमचे भाग्य. आजाद नगर वासी.

149

आशाताई बच्छाव

IMG-20220717-WA0028.jpg

माननीय.सुधीर भाऊ सारखा नेता लाभला हे आमचे भाग्य. आजाद नगर वासी.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
इरई नदीच्या पुरामुळे (लखमापूर ) आझाद नगर झोपडपट्टीतील लोकांचे पुराच्या पाण्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीची माहिती श्री अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा यांचे माध्यमातून माननीय आमदार.श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री यांना देण्यात आली असता माननीय सुधीर भाऊंनी झोपडपट्टीतील लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे ठरविल आज दिनांक 16/7/2022 ला माननीय माननीय श्री. सुधीर भाऊ यांच्या माध्यमातून शंभर टक्के झोपडी ची पडझड झालेल्या 40 परिवारांना ताडपत्री व वस्तीतील सर्व परिवारांना 200 अनाज किराणा किटचे वाटप करण्यात आले.या वाटप कार्यक्रम प्रसंगी मा.श्री.देवराव दादा भोंगळे जिल्हा अध्यक्ष भाजपा. मा.श्री.रामपाल सिंग भाजपा जेष्ठ नेते. मा.श्री.नामदेव डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा. मा.श्री.अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा. मा. श्री.शांताराम चौके. मा.श्री.विलास टेंभुरणे मा.श्री.नामदेव आसुटकर सौ.वंदना ठाकरे.सौ.समता गोचे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. ही मदत चालू असताना आझाद नगर वस्तीतील लोकांनी आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या असता कठीनातील कठीण प्रसंगाच्या वेळी वेळोवेळी आम्हा गरीब झोपडपट्टी वासीयांच्या मदतीला धावून येणारा नेता तो आमचा सुधीर भाऊ असून आमच्यासारख्या झोपडपट्टीतील राहणाऱ्या लोकांना असा नेता मिळणे हे आमचे पूर्वी जन्माच्या पुण्याचे भाग्य आहे. हा वाटप कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता श्री सुदर्शन निषाद श्री संतोष सोनकुर्ले श्री जितेंद्र ठाकूर श्री नरेंद्र मिर्झा श्री दादू मिर्झा श्री तुकाराम चंद्रवंशी श्री राधेश्याम धुर्वे श्री यशवंत चंदन यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous articleआता नरसी चौक सीसीटिव्ही कॅमेरेच्या नजरेत.
Next articleसिरोंचा पूरग्रस्त परिसरातील विद्यार्थ्यांना डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूरच्या वतीने भोजन किटचे वितरण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.