Home नांदेड हवालदिल शेतक-यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्या. ▪️राजु पाटील यांचे मुख्यमंञ्याकडे साकडे.

हवालदिल शेतक-यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्या. ▪️राजु पाटील यांचे मुख्यमंञ्याकडे साकडे.

118

आशाताई बच्छाव

IMG-20220717-WA0017.jpg

हवालदिल शेतक-यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्या.

▪️राजु पाटील यांचे मुख्यमंञ्याकडे साकडे.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
राज्यात गेल्या चार ते पाच दिवसा पासुन चालु असलेल्या अतिवृष्टिचा खरीप पिकाना मोठा तडाखा बसला आसुन हवालदिल शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपयाची अर्थिक मदत करावी व बिलोली तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा आशी मागणी समाजसेवक तथा भ्रष्टाचार समितीचे प्रदेश सरचिटणीस राजु पाटील शिंपाळकर यानी राज्याचे मुख्यमंञी एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निसर्गाच्या लहरी पणामुळे राज्यात गेल्या चार ते पाच दिवसा पासुन चालु आसलेल्या अतिवृष्टिचा मोठा तडाखा बिलोली तालुक्याला बसला आसुन सोयाबिन ,मुग,उडीद,कापुस यासह अन्य खरीप पिकांचे भाजीपाला व फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आसुन तसेच कौलारु घरादाराची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत. आशा बेघर कुंटुबाना अर्थिक मदत करावी तसेच विशेष बाब आशी की तालुक्याच्या उत्तरे कडुन गोदावरी नदी पुर्वेकडुन मांजरा नदी तर दक्षिणेकडुन मन्याड नदिचे आरपार वाहाते पाञ आसुन या नद्याना मोठ्या प्रमाणात महापुर आल्याने नदी काठा लगत आसलेल्या हजारो हेक्टर जमिनीवरील पिके मातीसह खरडुन गेलेली आहेत. तरी मुख्यमंञी साहेबांनी बिलोली तालुक्यातील अतिवृष्टी नुकसानीची विशेष बाब लक्षात घेऊन या हवालदिल शेतक-यांना विशेष अर्थिक मदत करावी व तालुका ओला दुष्काळ म्हणुन जाहीर करावा तसेच तालुक्यातील सरसकट पिक नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपयाची अर्थिक मदत करावी आशी मागणी समाजसेवक तथा अखिल भारतिय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे प्रदेश सरचिटणीस राजु पाटील शिंपाळकर यानी राज्याचे मुख्यमंञी एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे ता.१३ जुलै रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

Previous articleअतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना तात्काळ आर्थीक मदत द्या – प्रहार
Next articleभक्त आणि पावसाच्या हजेरीत येवती मठ संस्थान येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.