Home नांदेड पिक विमा भरल्यानंतर ई-पिक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करण्याचे आवाहन

पिक विमा भरल्यानंतर ई-पिक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करण्याचे आवाहन

100

आशाताई बच्छाव

IMG-20220715-WA0032.jpg

पिक विमा भरल्यानंतर ई-पिक पाहणी अंतर्गत
पिकांची नोंद करण्याचे आवाहन
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड (जिमाका) दि. 15 :- शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सहभाग नोंदवल्यानंतर / पिक विमा भरल्यानंतर शेतात पेरलेल्या पिकांची ई-पिक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

शेतकरी पिक पेरणीबाबत स्वयंघोषणापत्र देऊन विमा योजनेत सहभागी होतात परंतू प्रत्यक्ष काही शेतात पेरलेले पिक वेगळे असते. शेतकऱ्यांनी शेतात पेरलेल्या पिकांचाच विमा होणे आवश्यक आहे. विमा घेतलेले पीक शेतात पेरले नसल्यास शेतकऱ्यांचा विमा अर्ज बाद केला जाऊन त्याचे भरलेला विमा हप्ता जप्त केला जातो आणि त्यास विमा नुकसान भरपाईचा कोणताही दावा मिळत नाही.

शेतकऱ्यांनी पिक विमा भरल्यानंतर घेतलेल्या पिक संदर्भात त्यांनी चालू हंगामात ई-पिक पाहणीमध्ये केलेली नोंद ही अंतिम गृहित धरण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी स्वयंघोषणापत्रात नोंदविलेल्या पिकांचीच नोंद वेळेत ई-पिक पाहणीद्वारे करुन घ्यावी.

Previous articleसातबाऱ्यावर यावर्षी पेरलेल्या पिकांची नोंद नसली तरी पिक विमा भरता येतो
Next articleशेतात साचलेल्या पाण्यामुळे पिके कुजण्याची भीती, साचलेले पाणी वेळीच शेताच्या बाहेर काढा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.