आशाताई बच्छाव
नांदगाव तालुक्यातील ३६३५५ विद्यार्थ्यांना मिळणार १७४दिवसांचा तांदूळ पोषण आहार
नांदगाव (प्रतिनिधी, अनिल धामणे युवा मराठा न्युज नेटवर्क) –नांदगाव तालुक्यातील २९२ शाळांना ऑगस्ट २०२१ ते मार्च २०२२पर्यन्तचा पोषण आहार (तांदूळ) पासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागले होते.यासाठी आमच्या प्रतिनिधी अनिल धामणे यांनी वेळोवेळी शासकीय स्तरावर पाठपुरावा करून अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. इयत्ता पहिली ते पाचवी विद्यार्थी २२४९० आणि सहावी ते आठवी विद्यार्थी १३८६५ असे एकूण ३६३५५ विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ मिळणार आहे.एकुण माणसी विद्यार्थी प्रति शंभर ग्रॅम पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना सतरा किलो चारशे ग्रॅम तांदूळ मिळणार आहे तर सहावी ते आठवी घ्या विद्यार्थ्यांना प्रती एकशे पन्नास ग्रॅम तांदूळ एकूण सव्वीस किलो शंभर ग्रॅम तांदूळ मिळणार आहे.अशी माहिती गट शिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले यांनी आमच्या प्रतिनिधी ला माहिती दिली.






